ताज्या घडामोडी

गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता

गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 04/02/2024 : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ‘ पर्यावरण संवर्धन, रस्ते सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, महिला कौशल्य विकास व स्त्रियांचे आरोग्य या विषयावर श्री. जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा सांगता समारंभ रविवारी दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संग्रामनगर येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व श्री. जयसिंह मोहिते पाटील विद्यालयाच्या सभापती सौ निशा गिरमे ह्या होत्या . तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे होते. याप्रसंगी संग्रामनगर ग्रामपंचायतचे सरपंच अजित रेवंडे, श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक घुले व राउत तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले , डॉ. ऋषी गजभिये, कार्यालय प्रमुख विजय कोळी, रमजान शेख, दीपक शिंदे, ग्रामपंचायत संग्रामनगरचे कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सात दिवसीय शिबिराप्रसंगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संरक्षित अन्नपदार्थ या विषयावर डॉ. जयशीला मनोहर यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली . भरतकाम या विषयावरील कार्यशाळेत डॉ. राजश्री निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकता विकास व बेकरी प्रॉडक्ट या विषयावर गौरी सोहम गृह उद्योगाच्या उद्योजिका सौ. रुपाली पवार यांनी मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक दाखविले. राजश्री कोळी हिने कुल्फी व सिझलर्स ब्राऊनी याविषयीचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच महिलांसाठी प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पौष्टिक भरड धान्याची विविध खाद्यपदार्थ तसेच पौष्टिक भरड धान्याचे महत्त्व, पर्यावरण, आहार विषयक पोस्टर लावण्यात आले होते. तसेच महिलांची वजन उंची घेऊन त्यांचा बीएमआय काढण्यात आला.संग्रामनगर येथील आरोग्य केंद्रामध्ये महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली.यासाठी तज्ञ म्हणून डॉ. सविता गुजर तसेच डॉ. सायली चंदनशिवे व विश्रांती पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरा निमित्ताने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीमध्ये आहार विषयक ,पर्यावरण विषयक,भरड धान्याचे महत्त्व व महिलांच्या कायदेविषयक विविध प्रकारचे माहितीपर पोस्टर लावण्यात आले होते. शालेय किशोरवयीन मुलींना आहार या विषयावर डॉ. भारती भोसले यांनी मार्गदर्शन केले. बालकांसाठी सृजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले . यासाठी डॉ. छाया भिसे त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रस्ते सुरक्षा व कचरा व्यवस्थापन या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण, जलसंरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व या विषयावर जनजागृती रॅली, आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण व परिसर स्वच्छता, ,पर्यावरण पूरक उपक्रमाअंतर्गत माती विरहित शेती, स्वयंपाक घरातील कचरा व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना माहिती दिली.
सदर शिबीर महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले यांनी केले. कु. श्रध्दा इटकर सूत्रसंचलन कु. संचिता दीक्षित आणि आभार प्रदर्शन कु. करिष्मा कर्चे हिने केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button