ताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारण सोडून द्यावं

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारण सोडून द्यावं

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/03/2024 :
अहो हा माणूस कुणाच्या कापसामुळे दुध पितो आणि गेली तीस वर्षे सतत वडिलोपार्जित सत्तेचा महिमा त्यांना असे रतीबाचे दूध अक्षरशः खंगळून किंवा निथळून मिळते हा शोधाचा विषय. कारण ज्या चरवीतून मिळते ती चरवीच त्यांचे पिताश्री माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना गांधी कुटुंबाकडून वारसा हक्काने मिळाली होती. वास्तविक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकारणात तिनपाट अनुभव होता. हां केवळ आय.टी क्षेत्रातील वरिष्ठ पदवी प्राप्त झालेले ते जगविख्यात केंब्रिज विद्यापीठातील नामवंत आणि तितकेच हुशार विद्यार्थी होते यापलिकडे त्यांचं वेगळेपण नाही. त्यामुळेच तर या हुशार विद्यार्थ्यांना जमिनीवरच राजकारण कळलंच मग काय काॅंग्रेसच पानीपत झाल. वास्तविक ती पुरती रसातळाला गेली. पण काय फरक पडतो ज्या चव्हाण पितापुत्रांनी नाही तर अनेक काॅंग्रेसच्या नेत्यांनी गावागावात एवढी भरमसाठ आयुष्यातील मलई खाल्लीच नाहीतर ओरपली आहे त्यांचा आजच्या घडीला बालबाका होणार नाही. कारण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दंडुका नव्हता किंवा भाजपच्या नावाने बोंबलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्यासारखे बोंबील अळणी खाणारे सद्गुरू सुध्दा होते का ते गोविंद बागेत जाऊन शोधावे लागेल .
पण राजकीय चातुर्याचा खेळखंडोबा करणारे महनीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लय हुशार आणि तितकेच खवट असले तरी त्यांची लायकी ही नाल्यातला नालायक किड्यांच्या पात्रतेची नसेल पण त्याहीपेक्षा फारच वरची नाही आणि असेल जर दम असेल तर त्यांनी माझ्या विरोधात साधी पोलिस फिर्याद करावी , नाहीतर मी एका माजी मुख्यमंत्री असणाऱ्या एका शरदचंद्र पवारसाहेब यांच्या भाषेत हाताला काय लकवा मारलाय का ॽ नाही तर स्वाक्षरी न करणाऱ्या कराड दक्षिणच्या आमदाराची अब्रुची लक्तरे चव्हाट्यावर आणतो. कारण यात काय खोटं आहे. कारण हे सगळे आमदार काय किंवा खासदार काय एकजात नालायक नसतीलही पण जनतेच्या किती कामाचे आहेत हा जसा प्रश्न अनुत्तरित आहे तसाच तो मतदान करणारी जनता विवेक बुद्धीचा वापर करून व किती स्वाभिमानी पद्धतीने मतदान करते याचाही विचार व्हायला हवा. पण एकजात नालायक आणि तितकेच घरफोडी करणारे असतील तर जवळपास दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला एकटे नरेंद्र मोदी किती काळ पुरणार. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक घराघरात एका नरेंद्रने देशहितासाठी जन्म घेतला पाहिजे तरच भारतातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्यांची घराणेशाही संपुष्टात येईल. कारण आजपर्यंत काॅंग्रेस मध्ये सतत बापानंतर मुलगा आणि मुलग्यानंतर असा पाळणा चालूच आहे तो कधीतरी कायमस्वरूपी बंद व्हायला हवा ! पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साडेचार वर्षे मुख्यमंत्रीपद भोगलं पण त्यांनी साताऱ्यात विकासाचे काय दिवे लावले तर अशा महामहिम माणसाला महाविकास आघाडी लोकसभेत दिल्लीला पाठवणार हा मोठा मनोरंजक किस्सा आहे. कारण याच चव्हाणांची येत्या विधानसभा निवडणुकीत पुरती टरटर फाटणार आहे. त्यामुळे त्यांनी आता राजकीय संन्यास घेण्याची गरज आहे. नाहीतर कराडचा बिनकामाचा आमदार म्हणून वैतागलेली जनता त्यांना कायमचेच घरी बसले नाही तर घरी बसण्याच्या वयात ते आलेले आहेत. असो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर माझं व्यक्तिगत प्रेम आहे आणि ते अंतर्बाह्य ऊतूही जातंय तरीसुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना काडीचाही भ्रष्टाचार केला नाही यावर आजकालच शेंबड पोरं सुध्दा विश्वास ठेवणार नाही. कारण मुख्यमंत्रीपदी असणं याचा अर्थ कुरणात चरायला मुबलक वाव आणि तितकीच मोकळीक असते.

राजाभाऊ त्रिगुणे
सातारा.
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button