ताज्या घडामोडी
सत्याग्रह..

कविता विश्व…✍️
सत्याग्रह..
Akluj Vaibhav News Network. Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 4/11/2023 :
निर्भय निग्रही झालायं तो,
प्राणाची त्याला पर्वाच नाही..
कोसळू लागले जरी सर्वांग,
भूमिकेवर तरी ठामच राही !
लढतोय समाजासाठी तो,
नाही उरले जरी अंगात त्राण..
‘मराठा आरक्षण’ हाच उपचार,
नाहीतर म्हणतो जाईल प्राण !
ना करोडपती- ना राजबिंडा,
प्रामाणिकता हेच तन-मन-धन..
समाजासाठी सोडले घर अन् दार,
ना कुठला उत्सव- ना कुठला सण !
‘मनोज जरांगे पाटील’ म्हणजे,
क्रांतीचा निखारा- करारी आग्रह..
उपोषण करून उभारलाय लढा,
सत्ता झुकविणारा त्याचा सत्याग्रह !!
राजेंद्र काळे
बुलडाणा ९८२२५९३९२३