ताज्या घडामोडी
वेड्या शब्दांचा नाद

वेड्या शब्दांचा नाद
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/09/2025 :
लागलाय मला या
वेड्या शब्दांचा नाद,
शब्दांच्या मोह जाळात
माझ डोक झालय बाद ..१
नाद वेडी असली जरी
छंद लिखाणाचा जपलायं ,
मनातल्या विचार शब्दांना
कविता रुपात मांडलयं ..२
शब्दांच्या मोह जाळात
रोजच मी जरी अडकते,
वेडावलेल्या शब्दांनीच
मी परत त्यातुन निसटते..३
शब्द वेडाने भरलेल मन,
कविता रिकाम करतात,
भावनांचा चाललेला घोळ
लिखाणातून सोडवतात..४
म्हणून मी वेडी शब्दांची,
साहित्याच्या जगात रमणारी,
मनातलं व्यक्त करणारी
मनमोकळी, आनंदी, फुलणारी…५
सौ.धनश्री उरणे / म्हेत्रस राहु पिंपळगाव