डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाचा प्रारंभ

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाचा प्रारंभ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 15/8/2023 :
येथील सिटी सर्वे नंबर 987/61 मधील खुल्या जागेतील व अंतर्गत रस्त्यातील अतिक्रमण काढून मिळणे बाबत हेस वेल्फेअर फाउंडेशन आणि मूळ प्लॉट धारक यांच्या वतीने उपोषण संपन्न झाले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यदिनी नियोजित वेळी उपोषणास प्रारंभ झाला. साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता या प्रिंट मीडियाचे आणि aklujvaibhav.in या डिजिटल मीडियाचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचे प्रमुख उपस्थितीत विलासानंद विठ्ठल गायकवाड, राजेंद्र ज्ञानेश्वर कांबळे, आदिनाथ मोहन जाधव, माणिक साळुंखे, वृत्त एकसत्ता चे कार्यकारी संपादक सुनील ज्ञानेश्वर कांबळे, संतोष विठ्ठल गायकवाड, दत्तात्रय मल्हारी शिंदे, शंकर धर्मा पाटील, सागर सिद्धार्थ जगताप, प्रदीप तानाजी धाईंजे, भारत महादेव वाघमारे, तानाजी ज्ञानदेव काटे, अनिरुद्ध हनुमंत वाघमारे, शंकर रामदास गायकवाड, सखुबाई सदाशिव धाईंजे, युवराज सदाशिव धाईंजे, विजया पांडुरंग गायकवाड, लोचना मोहन जाधव, वैशाली रोहिदास धाईंजे, अलकाबाई अरुण माने, हिराबाई विश्वंभर क्षीरसागर, सबिया सलीम शेख, विद्या राजू साळवे, जिजाबाई तुकाराम धाईंजे, संगीता बलभीम धाईंजे, जयश्री मोहन धाईंजे, सुमन विठ्ठल कांबळे, यांच्यासह अनेक आबाल वृद्ध स्त्री पुरुष उपोषणास बसले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅकवर्ड हाउसिंग सोसायटी अकलूज चा अनेक वर्षापासून चा प्रलंबित असलेल्या या अतिक्रमण मुद्द्यावरून आणि अनेकदा निवेदने देऊन, आंदोलने झाली तरीही सदर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणीही यशस्वी झाले नाही. नियोजित उपोषण होऊ नये म्हणून आदल्या रात्री नगर परिषदेच्या आश्वासनाचे कागद फिरवून उपोषणातील हवा काढून घेण्याचा डाव खेळण्यास ते यशस्वी झाले होते. तथापी दलितांसाठी अर्धशतकाहून जास्त आयुष्य घालविलेल्या “एका हितचिंतकाने” ऐनवेळीच (अवघे वीस मिनिट अगोदर) आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
त्यामुळे आता याबाबतीत निर्णायक पातळीवर उपोषणाचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला होता. या संदर्भात यापूर्वीच वरिष्ठ पातळीवरून आदेश येऊन देखील नगरपरिषद पातळीवर आदेशाची अंमलबजावणी होण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे यावेळी उपोषणकर्त्यांनी निर्णायक पवित्र घेतला.
या वेळी स्वप्नील वाघमारे, राजाभाऊ खिलारे, शेखर खिलारे, अनिल साठे, यांनी उपोषण स्थळी भेट दिली. तसेच अनेक संघटनांनी उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला. स्वप्निल वाघमारे यांनी मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद अकलूज यांच्याशी फोनवर चर्चा करून तेथील प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले.
अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या तर्फे अकलूज नगरपरिषदचे कार्यालयीन अधीक्षक नरुटे, अतिक्रमण विभाग प्रमुख शिवरत्न लोंढे, यांनी समक्ष उपोषण स्थळी भेट देऊन दोन ते तीन दिवसात अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या सहीने अनधिकृत अतिक्रमण धारकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येतील, अशा नोटीस चे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यामुळे हेस वेल्फेअर फाउंडेशनचे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष विलासानंद विठ्ठल गायकवाड, राजेंद्र ज्ञानेश्वर कांबळे, आदिनाथ मोहन जाधव यांनी सांगितले.
अनधिकृत अतिक्रमणधारकांना सदर नोटीस समक्ष बजावण्यात येणार ? की पोस्टाने पाठविण्यात येणार ? याचे उत्तर अकलूज नगर परिषदेला आपल्या कृतीतून द्यावेच लागणारा आहे.
अकलूज मधील गांधी चौकातील माळशिरस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूचे, मटन मार्केट परिसरातील, सदाशिवराव माने विद्यालयाच्या कंपाउंडच्या पूर्व बाजूकडील अशा ठिकाणाचे पुनर्निर्माण होऊ शकले. मात्र बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधील प्रश्न अद्याप सुटलेला नाही. हा प्रश्न मार्गी लागेल का याचे उत्तर अकलूज नगरपरिषदच देईल.