✳️ शारदीय नवरात्रोत्सव प्रथमदिनी शिवभवानी नवरात्रोत्सव मंडळा मध्ये पहिली मानाची आरती संपन्न

✳️ शारदीय नवरात्रोत्सव प्रथमदिनी शिवभवानी नवरात्रोत्सव मंडळा मध्ये पहिली मानाची आरती संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/09/2025 : शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तीमय उत्साहात प्रारंभ झाला असून सकाळपासूनच घरोघर घटस्थापना होत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आपापल्या नियोजित स्थळी श्री देवीच्या मूर्तीची यथासांग पूजा विधी सह स्थापना करण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने देवी मंदिर तीर्थस्थाना पासून ज्योत आणण्याचे कार्य सांघिक पद्धतीने पूर्णत्वास नेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एकूणच अत्यंत मंगलमय भक्ती भावपूर्ण वातावरणात घटस्थापना तसेच देवी मूर्ती स्थापना करण्याच्या प्रक्रियेस वेग मिळाला आहे.
धाईंजे अड्डा, आंबेडकरनगर अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) येथील शिवभवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या श्री भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना सकाळी करण्यात आली. शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते पहिली मानाची पूजा आणि आरती घेण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सर्वेसर्वा सदाशिव ज्ञानोबा धाईंजे, आप्पा निवृत्ती मोरे महाराज, सुनील ज्ञानेश्वर कांबळे, सौ. सखुबाई सदाशिव धाईंजे, युवराज सदाशिव धाईंजे, सौ. कोमल युवराज धाईंजे, शांतीलाल सदाशिव धाईंजे, परशुराम सावंत, सोपान देवराव पवार, ओम सुनील कांबळे, वैष्णवी युवराज धाईंजे, धीरज सुभाष धाईंजे, यांच्यासह अनेक मान्यवर भाविक भक्त उपस्थित होते. आरती नंतर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.