कालखेड उपसरपंचपदी पत्रकार पंडीत परघरमोर

कालखेड उपसरपंचपदी पत्रकार पंडीत परघरमोर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
शेगाव । तालुक्यातील बहुचर्चित कालखेड गट ग्रामपंचायतवर उपसरपंच पदी वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रसिद्धी प्रमुख पंडीत गुलाबराव परघरमोर हे विजयी झाले आहेत.
शेगाव तालुक्यातील कालखेड गट-ग्रामपंचायतची निवडणूक 6 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पुरस्कृत एकता पॅनलचे पवन बरिंगे हे सरपंचपदी थेट जनतेतून निवडून आले होते. तर सहा सदस्य विजयी झाले होते.
त्यानंतर आज 24 नोव्हेंबर शुक्रवार रोजी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकीत ग्रा.पं.सदस्य पंडीत परघरमोर व सौ.उर्मीला प्रफुल्ल कडू यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदान प्रक्रीयेत पंडीत परघरमोर यांनी सौ.कडू यांचा 5 विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. त्यामूळे पंडीत परघरमोर यांना विजयी घोषीत करण्यात आले.
निवडणुक अधिकारी ग्रामसेविका सुषमा सावरकर यांनी निवडणूकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यावेळी ग्रा.पं.सदस्य भगवान हेलोडे, सविता राजेश सम्दुर, वत्सलाबाई रामा नावकार, पो.हे.कॉं. धनराज माने, अनंता तायडे ग्रा.पं.शिपाई इत्यादी उपस्थित होते.