ताज्या घडामोडी

सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार अधिकारी यांची घोडंचूक!

सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार अधिकारी यांची घोडंचूक!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/01/2025 : यंदा राज्याच्या मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनचा अर्थच बदलून टाकला आहे. कारण, येत्या २६ जानेवारीला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं, असा शासन निर्णय मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आला आहे. मुळात १५ ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं, तर २६ जानेवारीला (Republic Day 2025) ध्वजवंदन केल जातं. मात्र मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात २६ जानेवारीला ध्वजावंदन ऐवजी ध्वजारोहण करावं असं स्पष्टपणे उल्लेख केलाय हि आश्चर्यकारक बाब आहे.
स्वातंत्र्यदिनाला (Independence Day) (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेऊन मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जातं. तर प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी ) (Republic Day 2025) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी यांना याचा विसर पडला आहे की काय? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे.
त्यामुळे आता ही चूक लक्ष्यात घेत यात बदल करून नवीन शासन निर्णय जाहीर केला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button