♦️एका न झालेल्या उपराष्ट्रपतीची कहानी
♦️एका न झालेल्या उपराष्ट्रपतीची कहानी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
दिनांक 23/8/2025 : मित्रांनो कल्पना करा की अंबानी आणि अदानी मुंबईत एक केमीकल फॅक्ट्री टाकतात,
पैसे वाचवण्यासाठी त्या फॅक्ट्रीचे जे सेफ्टी सिस्टम असतात,त्यांना ते टाळतात,मुंबईतले पत्रकार २/३ वर्ष ओरडून ओरडून सांगतात की, या केमीकल फॅक्ट्रीज मध्ये सेफ्टी सिस्टमची अंमलबजावणी नाही झाली तर ही कॅमीकल फॅक्ट्री हजारो लोकांचा नरसंहार करेल,
भाजपवाले त्या सर्व पत्रकारांची तोंडे बंद करतात,सर्व सूचना दुर्लक्षीत करतात.
आणि एक दिवस सेफ्टी सिस्टम नसल्यामूळे त्या फॅक्ट्री मधून कॅमीकल सगळ्या परिसरात लिक व्हायला सुरवात होते.
15,000 लोकांचा जागीच मृत्यू होतो,
40,000 लोकं जागीच अपंग होतात,
६ लाख लोकांना विविध छोटेमोठे आजार होतात.
सरकारला ६० हजार लोकांना घर सोडून ईतर ठिकाणी हलवावं लागतं.
अंबानी आणि अदानी आरामात देश सोडून पळून जातात,
कोणत्याही मोठ्या राजकारण्यावर किंवा बिजनेसमॅन वर किंवा कोणत्याही मोठ्या अधीकाऱ्यावर कारवाई होत नाही.
फक्त छोट्या कर्मचाऱ्यांवर केस 26 वर्ष चालते, 26 वर्षांच्या नंतर शिक्षा सुनावली जाते ती पण फक्त 2 वर्षांसाठी आणि शिक्षा सुनावणीच्याच दिवशी त्या लोकांना बेल मिळून जाते.
नविन सरकार आल्यावर ते कोर्टात जातं की अम्हाला या प्रकरणाची पुन्हा चौकशी करायची आहे,पुन्हा फायल्या उघडायच्या आहेत,नेमकं कोणाकोणाचा दोष होता हे शोधायचं आहे.
आणि सुप्रिम कोर्ट पुनरचौकशीची परवानगी नाकारते.
आणि जो न्यायाधीश ती परवानगी नकारतो त्याच न्यायाधीशाला भाजप पुढे जाऊन उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार गाजत वाजत बनवते.
काय विचार,मत असतं तूमचं या प्रकरणावर ?
मित्रांनो खोटी कल्पना करायची गरज नाही कारण ही एक सत्यता आहे.
हे सगळे जे मी लोकं मेल्याचे,अपंग झाल्याचे आकडे सांगितले ते आहेत भोपाळ गॅस कांड 1984 चे.
1984 भोपाळ गॅस कांड मध्ये कंपनीची सगळी मोठी लोकं कोणत्याही रोकटोक शिवाय अमेरिकेत निघून गेली,
पत्रकार आणि संघटनांनी सतत चितवण्या दिल्यानंतर ही त्या फॅक्ट्रीवर कारवाई न करणाऱ्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांपैकी एकाचीही चौकशी झाली नाही.
लाखो लोकांचं संसार उध्वस्त झालं त्यात जबाबदार कोण तर छोटे कर्मचारी आणि त्यांना शिक्षा काय तर फक्त २ वर्ष,ती ही २६ वर्षांनी त्यात पण सेम डे लाच बेल.
राजीव गांधी यांच्या सरकारनी सर्व मोठ्या बिजनसमॅन,पॉलीटीशन्स आणि अधिकाऱ्यांना या केस पासून वाचवलं.
अमेरिकेकडे कधीच पळून गेलेल्या लोकांची मागणी करण्यात आली नाही.
जेव्हा मोदी सरकारला या केसची सखोल चौकशी करायची होती,तेव्हा पुन्हा चौकशीची परवानगी कोर्टाकडे मागितली आणि ज्या न्यायाधीशाने नकार दिला त्याच न्यायाधिशाला आता राहुल गांधींनी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवलं आहे.
माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी !
मूलगा असावा तर राहुल गांधींसारखा,
वडिलांनी केल्यालं पाप लपवण्यासाठी मूलगा आजही लोकांना बक्षीसे देतोय म्हणजे काय छोटी गोष्ट झाली का..?
बाकी जय संविधान,जय लोकशाही,डिक्टेटरशीप हाय हाय !
-विवेक मोरे