खा. सुप्रिया सुळे यांच्यामुळे अकलूज मध्ये उभा राहणार संविधान स्तंभ…

खा.सुप्रिया सुळे यांच्यामुळे अकलूज मध्ये उभा राहणार संविधान स्तंभ…
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 05/01/2024 : खा.सुप्रिया सुळे यांच्यामुळे अकलूज मध्ये संविधान स्तंभ उभा राहणार आहे. संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभे करण्यात यावे म्हणून त्यांनी दिनांक. 25 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलेले होते.
संविधानाची माहिती येणाऱ्या पुढील पिढीला मार्गदर्शक ठरावी याचे महत्त्व समजावे याकरिता आमदार रोहित पवार, आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, सांगली चे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मोहित गायकवाड यांनी विधापरिषद सदस्य अरुण लाड यांचेकडे निधीची मागणी केली असता त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी – सदस्य तथा सचिव जिल्हा नियोजन सांगली व जिल्हाधिकारी सोलापूर यांना तातडीने पत्र क्रमांक 1248 नुसार माझे मतदार संघातील मौजे अकलूज ,तालुका- माळशिरस, जिल्हा- सोलापूर येथे संविधान स्तंभ उभारणे करीता 7 लक्ष रुपये मंजूर केले आहे.
भारतीय संविधानाची निर्मिती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य व समता चळवळीच्या मंथनातून पुढे आलेल्या मूल्यांवर करण्यात आले. भारतीय समाजाने स्वतः साठी घेतलेली ही शपथ आहे त्याचे स्मरण सर्वांनी करून भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चत करणे अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे आहे भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी राज्य घटनेच्या न्याय , स्वातंत्र्य ,समता व बंधुत्व या मूल्यांचे पालन करणे हे कर्तव्य आहे तरच सक्षम आणि सुजाण भारतीय नागरिक तयार होऊ शकेल त्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी जानेवारी 2021 मध्ये राज्यात तील प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभाची उभारणी व्हावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यामुळे अकलूज सहित माळशिरस तालुक्यात जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होउन खासदार सुप्रिया सुळे, आ. अरुण लाड, मोहित गायकवाड यांना धन्यवाद देत आहेत.