ताज्या घडामोडी

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरण, जामीन अर्ज मंजूर

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरण,
जामीन अर्ज मंजूर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/12/2024 :
संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमानस्यातुन गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्या प्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील मुख्य आरोपी नं. 1 प्रदीप पांडुरंग माने वय 40 वर्षे, रा. माळशिरस यांचा दाखल केलेला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 16 एप्रिल 2024 फेटाळला होता त्यानंतर ॲडव्होकेट संदीप दत्तात्रय मगर यांनी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे मुख्य आरोपी प्रदीप पांडुरंग माने याचा जामीन अर्ज केला होता सदरचा जामीन अर्ज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला. याप्रकरणी ॲडव्होकेट पाटील आणि ॲडव्होकेट संदीप दत्तात्रय मगर यांनी काम पाहिले. ॲडव्होकेट संदीप दत्तात्रय मगर यांनी जामीन मंजूर होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले.
यात हकीकत अशी की, दि.२९/१२/२०१६ रोजी सकाळी 10.15 वाजणेचे सुमारास फिर्यादी अनिकेत जालिंदर उंबरे व फिर्यादीचे नातेवाईक मामा नानासाहेब दिलीप आसबे असे दोघेजण अश्विनी हॉस्पिटल समोरील लोखंडी बाकड्यावर बसलेले होते, त्यावेळी दोन इसम हे त्यांचे जवळ आले व त्यापैकी एकाने पूर्व वैमनस्यातुन नाना आसबे यांचेवर बंदुकीने गोळी झाडली त्यामुळे नाना आसबे हे पळू लागले, त्याचवेळी त्या दोघांनी त्याचे हातातील दोन बंदुकीने नानाचे डोक्यात, उजवे हाताला गोळ्या झाडल्या त्यामुळे नाना आसबे मोठ्या जखमा होऊन खाली पडला व त्या लोकांनी झाडलेल्या गोळीचे चरे फिर्यादीचे उजवे खांद्यावर व उजवे हाताचे कोपऱ्यावर लागून फिर्यादी जखमी झाला, त्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकी वरून निघून गेले. उपचारादरम्यान फिर्यादीचे मामा नानासाहेब आसबे हे मयत झाले. अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली. तद्नंतर फिर्यादी हा त्याचे गावी असताना पोलिसांनी नानासाहेब आसबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन इसमापैकी देवा जाधव याला अटक केली. त्याने प्रदीप पांडुरंग माने,रमेश विश्वनाथ धुळे, दशरथ विठोबा माने,राजू मधुकर भोसले, साजिद इब्राहिम सय्यद, सागर प्रताप मोहिते, सचिन दामोदर एखतपुरे यांनी संगनमत करून व कट रचून खून केल्याचे कबूल केले.
यात सरकारपक्षातर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील यांनी आरोपी वर बरेच गुन्हे दाखल आहेत असे म्हणत आरोपी पक्षाला विरोधी युक्तिवाद केला.
तरी यात मुख्य आरोपी प्रदीप पांडुरंग माने या करून वकिलांनी गेल्या 7 वर्षेहून अधिक काळापासून कारागृहात असल्याने स्थानिक कोर्टात केस अद्याप चालू न केल्याचे तसेच 84 साक्षिदार पेकी 1 ही साक्षीदार तपासणी न झाल्याचे आणि चार्ज देखील नाही झाला असा युक्तिवाद केला आणि मुक्त करावे यासाठी जामीन अर्ज दाखल केलेला होता.
तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने प्रदीप पांडुरंग माने याचा जामीन अर्ज मंजूर केला
यात आरोपीतर्फे वकील अँड. पाटील आणि अँड संदीप दत्तात्रय मगर यांनी काम पाहिले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button