मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/04/2025 : आपण दरवर्षी थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करतो. त्यांच्या प्रतिमांचे पूजन करतो, त्यांचे गुणगान गातो. देव देवतांची मिरवणूक काढतो. यामध्ये आपल्याला त्यांच्याविषयी अभिमान-आदर वाटणे अपेक्षित असते.
ज्या थोर महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित होऊन आपण त्यांचे स्मरण करतो, त्यांच्या चरित्रातून आदर्श काय घेतो? पूजन प्रतिमेचे नको, त्यांचा प्रतिभेचे झाले पाहिजे. त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा त्यामधून घेतली पाहिजे. आपल्या वर्तनातून तो बदल जाणवला पाहिजे.
पण हल्ली हे सगळे इव्हेंट झालेत. सक्तीने वर्गणी गोळा करायची, DJ च्या भिंती उभारून वेडीवाकडी हालचाल व विचित्र हावभाव करून उड्या मारत नाचायचे. ध्वनी प्रदूषण होते, त्याचे दुष्परिणाम सक्तीने सर्वांना भोगावे लागतात याचे भान रहात नाही. वाहतुकीचा घोटाळा होतो अन् त्या गोष्टीतील पावित्र्य घालवले जाते.
आजचा संकल्प
_शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम साजरे करताना त्याचे पावित्र्य राखू. वाद्यांच्या आवाजाने वातावरण दणाणून सोडण्याऐवजी विचारांची पेरणी करून समाज संघटित करू._
_- सौ. स्नेहलता स. जगताप._