ताज्या घडामोडी

त्यावेळी आम्हाला किती वाईट वाटलं असेल ?

संपादकीय….✍️

त्यावेळी आम्हाला किती वाईट वाटलं असेल ?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

श्रीपूर प्रतिनिधी दिनांक 30/10/2023 : “मागास म्हणून किती हिन वागवले, त्यावेळी आम्हाला किती वाईट वाटलं असेल” ? असा अंतर्मुख करावयास लावणारा प्रश्न प्रस्तुत लेखामध्ये श्रीपूर येथील
आमचे सहकारी मित्र, ज्येष्ठ विचारवंत पत्रकार बी.टी.शिवशरण यांनी उपस्थित केलेला आहे.
कोणी कोणत्या जातीत जन्माला यावे हे जरी आपल्या हातात नसले तरी आपण कसं वागावं, कसं जगावं व आपल्या कर्तृत्वाने, शिक्षणाने, सुसंस्कारित आचरणाने पुढे कसे जावे हे मात्र आपल्या मनगट, श्रम, बुध्दी यावर अवलंबून आहे हे मात्र नक्की. हजारो वर्ष ज्यांना त्यांच्या पिढ्यांना माणूस म्हणून नाकारले. त्यांचे हक्क हिरावून घेतले. त्यांना कुत्र्या मांजरा पेक्षा वाईट वागणूक दिली. तेंव्हा त्यावेळी काय वाटलं असेल याची कल्पना करा. हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, स्वाभिमान मागून मिळत नाहीत. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. धुळीतुन शिखराकडे गेलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व की ज्यांना अन्याय अत्याचार जातीयता धर्म रुढी परंपरा यांचे चक्रव्यूहातून जावं लागलं. मनूवादी समाज व्यवस्थेत माणसाचे जगणे एक दिव्य कोडे होते तेव्हा निसर्गानेच एक अशी मुस निर्माण केली. विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला जन्माला घातले आणि हजारों वर्षांपासून चालत आलेली मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळून टाकली. इथल्या व्यवस्थेत कुत्रा मांजराचा स्पर्श पाण्याला चालतं होता पण दलितांचा चालत नव्हता. त्यांचा विटाळ मानला जात होता. त्याच महाड येथील चवदार तळ्याला स्पर्श करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याला आग लावली. कुठेही रक्ताच्या एक थेंब न सांडता मानव मुक्तीची क्रांती घडवून आणली. आपल्या अफाट पांडित्य बुध्दी वैभवाने इथल्या सनातनी व्यवस्थेला सुरुंग लावला. दलितांना माणुसकीचे हक्क स्वातंत्र्य स्वाभिमान अस्मिता बहाल केली. एवढेच नव्हे तर जो देश मनुस्मृती विचारधारा आणि धर्म, जात, रुढी परंपरा, घेऊन वाटचाल करत होता, ती जाळून या देशाची स्वतंत्र राज्यघटना लिहिली व सर्वांना समान न्याय, समान बंधुता स्वातंत्र्य दिले. हा नियतीने उगवलेला सुड होता. दगडधोंडे पुजले जातं होते. पण दलितांना नाकारले होते. उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य या नावाने खोटा बडेजाव खोटी प्रतिष्ठा मिरवणारे भारतीय संविधानाने एका फटक्यात सरळ झाले. बाबांनो मागास जिणं काय असते तस जिणं कधीच कोणाच्या वाटेला येऊ नये. कसल्या सवलती ? कसलं आरक्षण ? त्यासाठी धर्म रूढी जातीयता अस्पृश्यता हीन व तुच्छ जिवनाच्या नरक यातनेतून गेलेल्यांना कळते. ज्यावेळी आम्हाला डोळे असुन पहाता येत नव्हते. कान असून ऐकता येत नव्हते. पाय असून चालता येत नव्हते. वाचा असून बोलता येत नव्हते. पण असा एक युगपुरुष जन्माला आला आणि आमच्यात प्राण ओतला. चैतन्याचा शिडकावा केला आणि आम्ही माणूस झालो. बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर थोडा विचार करा. असे लेखाच्या शेवटी बी.टी.शिवशरण यांनी नमूद केलेले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button