संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाची बेलवाडीत जय्यत तयारी.

संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाची बेलवाडीत जय्यत तयारी.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/6/2023 :
संत शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील बेलवाडी येथे होणाऱ्या पहिल्या गोल रिंगणाची तयारी झाली आहे. मंगळवार दिनांक 20 जून रोजी सकाळी 8 वा. हे रिंगण होईल.
वर्षानुवर्षे चालत आलेला देहू आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा आज दुपारी बारामती हून बांदलवाडी, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर येथून सणसर येथे मुक्कामी येत आहे. सणसर येथील मुक्कामानंतर उद्या सकाळी सात वाजता पालखीचे प्रस्थान बेलवाडी गावाकडे होऊन मंगळवारी सकाळी आठ वाजता बेलवाडी येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण लाखो शेतकरी कष्टकरी कामगार वारकरी व बेलवाडी गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.अशी माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी बेलवाडी येथे दिली. ते म्हणाले की बेलवाडीतील सरपंच सौ जामदार, ग्रामसेवक, माजी सरपंच, सदस्य अनिल खैरे, विद्यमान उपसरपंच, माजी सरपंच बापूराव पवार, माजी उपसरपंच सौ पवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य पवार, ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी खरचे, पत्रकार भिसे, छत्रपतीचे संचालक सर्जेराव जामदार, माजी संचालक व्हाईस चेअरमन कांतीलाल जामदार व सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र मुळीक, शहाजीअण्णा शिंदे, युवक कार्यकर्ते सुधीर पवार, सागर पवार व डिलाईट डेअरीचे चेअरमन अर्जुन देसाई, संजय विलास पवार, अजित पवार, संजय मुळीक, छत्रपतीचे माजी उत्कृष्ट कामगार सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मुळीक, विजय पवार, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव जाचक, श्रीनिवास घोलप, रविशंकर पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री कदम, विकास सोसायटीचे माजी चेअरमन मोहन जामदार, दत्तोबा देसाई अंकुश जामदार आदी बेलवाडी गाव प्रमुखांनी या ठिकाणी कष्ट घेतले असून इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यावेळी रिंगण सोहळ्याच्या संदर्भामध्ये जय्यत तयारी केलेली असल्याचे सांगितले.
बेलवाडी पालखी स्थळ ठिकाणी मध्यभागी पालखी विसाव्याचे ठिकाण केलेले असून या वेळेचा पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण हे मोठ्या दिमागाने होऊन महाराष्ट्र राज्यासह, देशभरातील शेतकरी कष्टकरी वारकरी संप्रदायाच्या डोळ्याचे पारणे फेडणार अशी माहिती बेलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र मुळीक यांनी अकलूज वैभव ला दिली.