भाळवणी येथे हटकर कोष्टी युवक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

भाळवणी येथे हटकर कोष्टी युवक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
भाग्यवंत ल.नायकुडे, अकलूज.
(जयपूर, राजस्थान येथून)
दिनांक 16/06/2025 :
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील हटकर कोष्टी युवक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गंगाधर कोले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार कोले,सुरेश कापसे, संजय आंबेकर, माणिक कोले, चंद्रकांत कापसे,मुरलीधर कोले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनंजय धोत्रे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या नादी न लागता अभ्यासाच्या नादी लागले पाहिजे पालकांनीही आपला मुलगा काय मोबाईलवर पाहत आहे याकडेही लक्ष दिले पाहिजे. यावेळी प्रशांत माळवदे म्हणाले की आपल्या पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे मुलगा अभ्यास करतो का याकडेही पहिले पाहिजे. हटकर युवक संघटनेने शालेय विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन जो सत्कार केला आहे ती अभिमानाची गोष्ट आहे. संघटनेच्या कार्यास शुभेच्छा ही माळवदे यांनी दिल्या. यावेळी 31 विद्यार्थीना वह्या,पेन,बाटली, कंपास आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब कापसे यांनी केले होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कापसे यांनी केले तर आभार राहुल लंगोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कोले,अशोक शहाणे,हरिदास कापसे,राजू कापसे, तुकाराम कापसे, संतोष कापसे, राहुल कापसे, राजू निराळी, पप्पू कोले यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमास विद्यार्थी पालक महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.