ताज्या घडामोडी

तांदुळवाडी आणि परिसरात बिबट्याची दहशत

तांदुळवाडी आणि परिसरात बिबट्याची दहशत

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India.
Mo. 9860959764.

🔰डी एस गायकवाड

तांदुळवाडी दिनांक 29/11/2023 : माळशिरस तालुक्यातील तर तांदुळवाडी आणि परिसरात बिबट्याच्या दहशतीने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून वनविभाग मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक वन विभागावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
तांदुळवाडी आणि परिसरात दररोज नवनवीन घटना बिबट्याच्या संदर्भात ऐकावयास मिळत आहेत. कधी इकडे दिसला तर कधी तीकडे दिसला अशी परिस्थिती असताना लोकांना संध्याकाळचे, रात्रीचे फिरणे मुश्किल झाले आहे. यामुळे शेती व्यवसायावर परिणाम पडताना दिसत आहे. दिवसाच सगळी कामे उरकावी लागताहेत. बिबट्या आहे की तरस आहे याबाबत सांशकता असली तरी या हिंस्त्रक प्राण्याने जीवन जगणे मुश्किल करून टाकले आहे. या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांना माहिती दिली असली तरी ते मात्र याबाबतीत सतर्कता दाखवताना दिसत नाहीत. वन विभागाला माहिती दिली की, हो आमचे लक्ष आहे, तुम्ही घाबरू नका एवढेच त्यांच्याकडून उत्तर येते. पण ठोस पाऊल मात्र वन विभागाकडून कोणतेच उचलले जाताना दिसत नाही त्यामुळे लोकांमध्ये घबराहट तर आहेच पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन देखील करण्याच्या तयारीत अनेक नागरिक दिसत आहेत. अनेकांच्या शेळ्या वगैरे फस्त करताना हा हींस्त्रक प्राणी दिसत आहे पण वनविभाग मात्र यावर हाताची घडी तोंडावर बोट अशा अवस्थेत पाहायला मिळत आहे. वाड्या वस्त्यावर तर या बिबट्याची दहशत निर्माण झाली असून यावर लवकरात लवकर उपाय शोधावा अन्यथा वन विभागाच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले जाईल अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button