ताज्या घडामोडी
नगरसेविका रेश्मा टेळे यांनी स्वखर्चातून बसविले फ्लेवर ब्लॉक

नगरसेविका रेश्मा टेळे यांनी स्वखर्चातून बसविले फ्लेवर ब्लॉक
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
माळशिरस प्रतिनिधी दिनांक 27/03/2024 :
माळशिरस नगरपंचायतच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांनी माळशिरस येथील महिला सद्गुरु बैठकीच्या ठिकाणी साठ हजार रुपये किंमतीचे फ्लेवर ब्लॉक स्वखर्चाने बसवून दिले.
त्यामुळे त्यांच्या सामाजिक दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गत अनेक वर्षापासून अरविंद लोंढे यांच्या आशीर्वाद वखार येथे महिला व पुरुष त्याचबरोबर बाल बैठक ही भरते. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये चिखलाने सद्गुरु भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरसेविका टेळे यांनी पुढाकार घेऊन सुमारे साठ हजार रुपये किंमतीचे फ्लेवर ब्लॉक स्वखर्चाने बसवून दिले.