उड्डाण पुलाचा परिसर अखेर उजळला, नागरी समितीचा संघर्ष आला फळाला

उड्डाण पुलाचा परिसर अखेर उजळला, नागरी समितीचा संघर्ष आला फळाला
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
कारंजा – घाडगे दिनांक 7/11/2023 : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण होताच उड्डाण पुलावरून वाहतूक सुरु झाली होती. परंतु पाच महिन्यापासून पथदिवे मात्र बंद होते. स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सातत्याने याकडे लक्ष वेधले होते. दिवाळीपूर्वी उड्डाण पुलावरील पथदिवे सुरू झाल्याने रात्रीचा नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागरी समस्या संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले आहे.
उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाताच १७ जून २०२३ पासून उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू झालेली होती. परंतु उड्डाणपुलावरील व सर्विस रोडच्या बाजूला जे स्ट्रीटलाईट आहे ते मात्र जांडू कंट्रक्शन कंपनीच्या दिरंगाईमुळे बंद होते. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन नागरी समस्या संघर्ष समितीने २४ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते. त्यानंतर ७ ऑक्टोंबर रोजी स्मरणपत्र देऊन दिवाळीपूर्वी पथदिवे सुरू करा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता.
उड्डाण पुलाच्या पलीकडे कारंजा शहरातील वार्ड न.१५, १६ व १७ ची वस्ती आहे, खैरी पुनर्वसनची वस्ती आहे, भालेवाडी दाभा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी काही वस्ती आहे, धावडी रोडवरील काही वस्ती आहे. या सर्व वस्तीमधील लोकांचे आवागमन या पुलाखालून व पुलाच्या दोन्ही अंडरपास बोगद्या मधून होत असते. न्यायालया पुढील अंडरपास बोगद्यामध्ये प्रचंड अंधाराचे साम्राज्य राहत होते. अंधारामुळे महिलांना मार्केटमध्ये जाणे, मार्केट मधून घरी येणे भीतीदायक ठरले होते. वार्ड नंबर 14 मधील नागरिकांनाही सर्विस रोडने जाताना अंधारातून जावे लागत होते.
परंतु दिवाळी पूर्वी आता पथदिवे सुरू झाल्यामुळे सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. “संघर्षातून समाधान मिळाल्याचे ” मत नागरी समितीने व्यक्त केले आहे. यापुढे उड्डाण पुलाच्या रंगरंगोटी करीता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठपुरावा केल्या जाईल असे नागरी समस्या संघर्ष समितीने कळविले आहे.