कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार : सई भोरे पाटील

कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार : सई भोरे पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 06/07/2023 :
माझा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे.जे जमतय ते करणार आणि जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं करणार असे मत माळशिरस तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी तथा डीवायएसपी डॉ.सई भोरे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या बदली नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील यांनी गुरुवार दिनांक 6 जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकलूज येथे पदभार स्वीकारला.त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्न जाणून घेतले.
पुढे बोलताना सई भोरे-पाटील म्हणाल्या येईल त्या अडचणींना तोंड देत गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे हा माझा प्रामाणिक हेतू असेल.कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी मी जे काही करणार आहे ते करणार असून जनतेनेही सामाजिक व्यवस्थेचा आदर करावा असे ही डॉ.सई भोरे-पाटील म्हणाल्या.