“खेळ प्रत्येक संकटावर मात करण्याची धीरोदत्त वृत्ती निर्माण करतो” – जयसिंह मोहिते पाटील

“खेळ प्रत्येक संकटावर मात करण्याची धीरोदत्त वृत्ती निर्माण करतो” – जयसिंह मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 8/11/2023 : “कोणताही खेळ हा उन्नत आणि उदात्त असे संस्कार करत जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची धीरोदत्त वृत्ती निर्माण करतो”. असे मत प्रतिपादन करून “खेळाने खिलाडू वृत्ती वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे” असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळ व प्रताप क्रीडा मंडळाने अनेक राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार खेळाडू तयार केले. त्याचबरोबर कलाक्षेत्रात ही उत्तुंग भरारी घेतलेली आहे. माळशिरस तालुक्यातील व पंचक्रोशीतील खेळाडूंना देशी खेळाबरोबरच विदेशी खेळांचे प्रशिक्षणही दिले त्यातून अनेक खेळाडू तयार झालेत त्याचबरोबर सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या १२ विविध शालेय क्रीडा स्पर्धेत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील तालुकास्तरीय स्पर्धेत २२१, जिल्हास्तरीय स्पर्धेत ५६, विभागीय स्तरावर २० तर राज्यस्तरीय ०७ अशा एकूण २८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अशा गुणवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यामध्ये चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत १७ वर्षे मुले यांनी ४ x१०० मी. रिले स्पर्धेत तृतीय क्रमांकाने अर्थव शेळके, सुयेश झंजे, अर्जुन शिराळ, सुजित रास्ते व सोहम चव्हाण या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तर अनुज जाधव शुटींग, निरंजना इंगोले हँडबॉल राज्यस्तरीय निवड, उबेद आतार वूशु विभाग स्तरीय द्वितीय, वैभव चव्हाण पाच किलोमीटर चालणे पुणे विभागात तृतीय, यशराज देवकर, सानिका जाधव, चक्रधर पावशे, इमरान शेख, पियुष पाटील, संयुजा पाटोळे, महेक शेख या सर्वांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंगसाठी निवड, वेदांत लावंड तिहेरी उडी व सिद्धी राउत शूटिंग साठी विभास्तरावर सहभाग घेऊन यश संपादन केले.
अशा या गुणवंत विद्यार्थ्यांनचा व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक उमेश भिंगे, संजय राऊत, भिमाशंकर पाटील, तानाजी शिंदे, भिमराव दुधाळ याचाही सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्था संचालक पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, शाळा समिती सदस्य काझी साहेब, मनोज रेळेकर, मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, व्यवसाय विभागाचे उपप्राचार्य रणवरे सर, शिक्षक व शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.