उठल तुफान क्रांती च ,,,!

उठल तुफान क्रांती च ,,,
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state,
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक : 12/12/2023 :
उठल तुफान क्रांती च ,,,
हाती घेऊन संविधान,,,,,
जे आजवर ठेवलं दडपून ,,,,
ते हक्क आणि अधिकार ,,,,,
मिळवून देण्या सज्ज झाली ,,,
ही अहील्याची फौज,,,,,
म्हलारराव होळकरांचा
आशीर्वाद घेऊन संगतीला
उभारू धनगर फौजेला ,,
नको आत्ता कोणी दलाल ,
त्यांच्या पक्षाच हित पाहणार ,,,
फेकलेल्या सत्ता तुकड्यावर
होऊनआमदार ,खासदार ,,
समाजाला झुलवत ठेवणार,,,,,,
मिळवून देऊ हक्काचं ,,,,
आपल एस टी च आरक्षण ,,
होतील हक्कान आमदार , हक्कान खासदार ,,,,
त्यांचा आवाज घुमेल देशाच्या संसदेत ,
राज्या ,,, राज्याच्या विधानसभेत,,,
आर्थिक कोटा राहील
समाजाच्या संख्या प्रमाणात,,,
शिक्षण आणि नौकरीत
राहील कोटा भरपूर ,,,,,
हे जाणती प्रस्थापित ,
त्यांचे हक्क , कोटा दडवून
फिरवती हात आपल्या पाठीवर
करती चलाखी वरतून
लावे कलागती जाती जाती त
झुंज म्हणे ओबीसीत च
त्याचा कोटा ,, शेळीचे शेपटा गत
नाही सुधार , नाही अधिकार
नाही लोकसभेत ,, ना विधानसभेत
हक्काचं मतदारसंघ,,,,
फिरती रानोमाळ ,, संगे घेऊन बिऱ्हाड
कसं व्हावं आपलं पोर ,,,
आय ए एस , आय पी एस?
मिळवू जेंव्हा एस टी आरक्षण
तवा होईल चमत्कार ,
वाड्या वस्त्या जोडून , नव्या शाळा काढून , घडवू पुढच्या पिढीस
स्वप्न पाहू आपण ही
होईल धनगर पंतप्रधान
इतकी ताकद समाजात
दाखवून देऊ उभ्या जगतास
नव युगाची गाथा
फुले शाहू आंबेडकर विचार
सोबतीला होळकर शाही घेऊन
करू आपले राज्य स्थापन
मिळवू एस टी चे आरक्षण
क्रांती गीतकार :
ऍड. अविनाश टी. काले
अकलूज 9960178213