नागडे….❗ शारीरिक, मानसिक आणि वैचारिक ‼️
नागडे….❗ शारीरिक, मानसिक आणि वैचारिक ‼️
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 15/02/2024 :
मी पूर्वी एका लेखात माझे मित्र रमाकांत शालगर यांच्या बद्दल लिहिले होते आज मला रमाकांत यांची एक आठवण आपणास शेअर करायची आहे
रमाकांत माझे जवळजवळ चाळीस वर्षांतील मित्र होते त्यांचे निधन झाले व आमच्या मैत्रीत खंड पडला
त्यांच्या व माझ्या मैत्रीचा दुवा म्हणजे रा स्व संघ होय
नागडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
एकदा काय झाले आम्ही एका गावी गेलो होतो एका रस्त्याने जाताना काही महिला घाईघाईने जाताना दिसल्या जरा पुढे गेल्यावर आम्हास एक स्वयंघोषित वेडा इसम दिसला तो काय करत असे महिला दिसल्या की आपली चड्डी काढून पॅन्ट काढून आपल्या गुप्तांगाचे प्रदर्शन करत असे महिला बिचार्या लाजून खाली मान घालून तेथून जात असत
शालगरना नेहमीप्रमाणे राग आवरला नाही ते म्हणाले अनिल चल जरा हात मोकळे करूया मी व शालगरनी या तथाकथित स्वयंघोषित वेड्याला ठोकावयास सुरुवात केली
आमची मारहाण पाहून तिथे अनेक लोक जमले त्यातील एक पुढे आला तो म्हणाला तो वेडा आहे त्याला काय कळते हा पुढारी बहुतेक माजवादी असावा शालगर त्याला म्हणाले भडव्या तुला याचा इतका पुळका आला असेल तर त्याला तुझ्या घरी घेऊन जा व त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यास उपभोगू देत दरम्यान तो वेडा शहाणा होऊन पळाला
मला भडवा ही शिवी ऐकली की माननीय बाळासाहेब ठाकरे हे वागळे यास मुलाखतीच्या दरम्यान भडवा म्हणाले होते हे आठवते
आज आपल्या महाराष्ट्रात स्वयंघोषित पत्रकार व विचार स्वातंत्र्याचे प्रणते यांचे पेव फुटले आहे
हे तथाकथित स्वयंघोषित वैचारिक स्वातंत्र्य वाले कोणाचेही कधीही वाटेला जातात व आपली वैचारिक नागडे पण दाखवत फिरतात यांना जरा जरी विरोध केला तर शरद पवारांच्या पासून उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत आग पाखड करायला सुरु करतात
या तथाकथित स्वयंघोषित वैचारिक पत्रकारांना कोणाबद्दलही काहीही व केव्हाही बोलायचे स्वातंत्र्य आहे त्यांनी कोणावरही कशीही टीका करावी व आपले वैचारिक नागडे पण दाखवत फिरावे असे झाले आहे
खोटा अजेंडा चालवणे प्रत्येक गोष्टीत सनातन धर्म हिंदू धर्म भारतीय जनता पक्ष संघ यांच्या बद्दल व यांच्या सर्वोच्च नेत्यांच्या बद्दल अनापक्षनाप बोलणे लिहिणे यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटत आहे
यांचे वैचारिक नागडे पण हे चर्चेत येत नाहीत खोट्या कल्पना खोट्या घटना , विचार समाजात पसरून हे आपला वामपंथी अजेंडा चालवत आहेत
एका निखिल वागळे ची गाडी फोडल्यावर शरद पवारांना वाईट वाटत आहे पण या देशात झुंडशाहीने शीख ब्राह्मण यांची घरे जाळली गेली त्यांना ठार मारले गेले त्यावेळी हे पुत्री प्रेमाने आंधळे झालेले धृतराष्ट्र शांत बसले होते
आजवर या देशात हजारो हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यावेळी हे आंधळे लोक काही बोलत नाहीत आता नव्याने धर्मनिरपेक्षवादी झालेले ऊबाठावाले
तर यांच्या बद्दल न बोललेलेच बरे
आम्ही शिवी दिली आहे तुम्ही शिवीनेच मला उत्तर द्या ही अपेक्षा हिंदू लोकांच्या कडून आता यापुढे या पुरोगामी मंडळींनी ठेवू नये
दुटप्पी वागळे
आपणास आठवत असेल कुरमुसे यास जितेंद्र आव्हाड याने जायबंदी केले होते त्यावेळेस वागळे यास अत्यानंद झाला होता त्याने आव्हाडचे अभिनंदन केले होते आता यास लोकशाही संविधान दिसत आहे
लातोकेभूत बातों से नही मानते
(प्रासंगिक)
ॲड अनील रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी