ताज्या घडामोडी

ओबीसी कमिशन आयोग नवी दिल्ली चे चेअरमन मा.ना.जगदीश यादव आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

ओबीसी कमिशन आयोग नवी दिल्ली चे चेअरमन
मा.ना.जगदीश यादव आज पासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 16/01/2024 :
ओबीसी कमिशन आयोग नवी दिल्लीचे चेअरमन
मा.ना.जगदीश यादव हे दिनांक 16 व 17 जानेवारी 2024 रोजी पुणे व अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य व एनयूबीसी महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त राष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित राहुन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत तर प्रख्यात साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.अशी माहिती विठ्ठल राजे पवार(अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक,शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य व एनयूबीसी महाराष्ट्र राज्य) यांनी साप्ताहिक अकलूज वैभव ला सांगितली. या समारंभामध्ये श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या नावाने दिल्या जाणारा “राष्ट्ररत्न योद्धा शेतकरी पुरस्कार”वितरण आणि एन. यु. बी. सी.चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अजय गजानन तल्हार, इंजिनीयर राजेंद्र कुंजीर, कार्यकारी संचालक आर एस नाईक अहमदनगर जिल्हा, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा नागवडे व इतर विविध मान्यवर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मौलाना अबुल कलाम आझाद पीएमसी सभागृह, गट क्रमांक 296, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क, पुणे 01 येथे बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे. केशवनगर मुंढवा ससाणे कॉलनी शेतकरी संघटना राष्ट्रीय कार्यालय येथेही ओबीसी आयोगाचे चेअरमन भेट देणार आहेत. समारंभास एन यु बीसी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट राजेंद्र दीक्षित, अंबादास कोरडे पाटील (अध्यक्ष प्रदेश कार्यकारणी समिती), मा.न्या.जी.डी. इनामदार (प्रदेश कार्याध्यक्ष), प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल व सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे, दीपक फाळके (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र), पुणे जिल्हाध्यक्ष संतोष पाचंगणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button