‼️ मोनालिसा पेंटिंग ‼️

‼️ मोनालिसा पेंटिंग ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/7/2025 :
मोनालिसा ही जगातील सर्वात रहस्यमय महाग आणि चर्चित पेंटिंग मानली जाते. या पेंटिंग विषयी आत्ता पर्यंत सर्वात जास्त लिहिलेले, वाचलेले आणि संशोधन केलेले आहे. ही पेंटिंग जवळ जवळ पाचशे वर्षांपूर्वी प्रसिध्द चित्रकार लिओनार्दो द विंची यांनी बनवले होते. त्यांनी ही पेंटिंग १५०३ मध्ये बनवण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर १४ वर्षा नंतर ही पेंटिंग पूर्ण तयार झाली. हे पेटींग ज्या स्त्री चे आहे असे म्हटले जाते, ती म्हणजे लिसा डेल जिओकोंडो. लिसा डेल जिओकोंडो हिचे १५ जुलै १५४२ ला निधन झाले. तिचा चा जन्म १५ जून १४७९ ला नेपल्स येथील फॉरेनटाईनच्या प्राचीन, थोर कुटुंबात झाला. तिचे पहिले नाव, डे घेरार्डिनी होते. १४९५ मध्ये तिने श्रीमंत फ्लोरेंटाईन व्यापारी, सेर फ्रान्सिस्को डेल जिओकॉन्डोशी लग्न केले आणि तिच्या उर्वरित आयुष्यात ती फ्लॉरेन्स येथे राहिली. बहुधा तिच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी ती महान कलाकार लिओनार्दो विंचीला भेटल्याचे म्हटले जाते. तेथून त्यांच्यात मैत्रीचा धागा विणला गेला.
तिच्या सौंदर्याने आणि मोहक हास्याने प्रेरित होवून लिओनार्दो ने हे पेटींग केल्याचे म्हटले जाते. पेटींग पूर्ण झाल्यावर १५१६ मध्ये लिओनार्डो दा विंची फ्रान्सला, फ्रान्सिस १ च्या दरबारात गेला, तिथे त्याने त्याच्या सोबत ‘मोनालिसा’ हे पोर्ट्रेट आणले. यासाठी राजाने त्याला £4,000 दिले, त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. यानंतर तीन वर्षांनी लिओनार्डो चे निधन झाले. त्याची प्रसिध्द ‘मोनालिसा’ एक शतकाहून अधिक काळ फॉन्टेनब्लू मध्ये राहिली. त्यानंतर लुई चौदावा तिला व्हर्सायला घेऊन गेला.
फ्रान्सच्या क्रांती नंतर गूढ स्मित असलेल्या या पेंटिंगला लूईच्या भिंतींवर जागा मिळाली व नंतर लुईच्या इतर किंमती वस्तू सोबत फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवली गेली. आपल्या मोहक हास्यासाठी प्रसिध्द असलेली ‘मोनालिसा’ ही फक्त एक पेंटींग नाहीतर एक रहस्य सुध्दा आहे. तिच्या या हास्यावर अनेक लोकांनी संशोधन केले गेले आहे.
मोनालिसाच्या चेहऱ्यावरील हास्य प्रत्येक कोनातून वेगवेगळे पाहायला मिळते. मात्र आता ते पेंटींग फिक्कट पडत आहे. तिचे मोहक हास्य दाखविणारे ओठ पेंट करण्यासाटी लिओनार्दो दा विंची ला बारा वर्षे लागली होती, असे सांगितले जाते. ही पेंटिंग बनवण्यासाठी ३० पेक्षा जास्त लेअर्सचा वापर केला गेला आहे. यामधील काही लेयर मानवाच्या केसा पेक्षाही लहान आहे. या पेंटिंगचा विचार केला तर खूप मोठे असेल असे वाटते, परंतु ही पेंटिंग खूप लहान आहे. या पेंटिंगचा आकार ३० बाय १२ इंच आहे आणि एकूण वजन आठ किलो ग्रॅम आहे. मात्र या मोहक हास्याच्या प्रेमात पडणारे अनेक जण आजही म्युझियम मध्ये पेंटींग समोर प्रेमपत्र आणि फुले सोडून जातात.
मोनालिसाचे हे पेंटिंग आधी काही प्रसिध्द नव्हते. रिस लुब म्युझियम पॅरिस मधून या पेंटिंगची चोरी झाल्या नंतर मात्र या पेटींगला सर्वात जास्त प्रसिध्दी मिळाली. २१ ऑगस्ट १९११ मध्ये पॅरिस मधल्या रिस लुब या मोठ्या म्युझियम मधून हे पेंटींग चोरी झाली. ही चोरी झाल्या नंतर सर्वात पहिला संशय पेंटर पाब्लो पिकासो याच्यावर गेला होता, परंतु नंतर झालेल्या चौकशी मध्ये हा आरोप चुकीचा ठरला. खूप शोध घेतल्या नंतर म्युझियम मधील विन्सेन्जो पेरुगिया या कर्मचाऱ्याने ती पेंटिंग चोरली असल्याचे निष्पन्न झाले. तो हे पेंटिंग परत इटलीला घेऊन जाणार होता. त्याच्या म्हणण्यानुसार ही इटली मधील प्रसिध्द आहे. इटली मध्ये काही काळ ठेवल्या नंतर परत या पेंटिंगला म्युझियम मध्ये ठेवण्यात आले. चोरी केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची शिक्षा सुध्दा दिली गेली होती, परंतु इटली मधील लोकांनी त्याला देशभक्त मानले होते.
दुसरे महायुध्द सुरु झाले होते, तेव्हा मोनालिसाचे पेंटिंग सहा वेळा हलवण्यात आले. याचे कारण होते की पेंटिंग जर्मन लोकांच्या हाती लागू नये. या पेंटिंगला नुकसान पोहोचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले. १९५६ मध्ये एका पर्यटकाने यावरती दगड फेकला, इतकेच नाही तर एका व्यक्तीने यावर ॲसिड सुध्दा फेकले होते. यानंतर मात्र या पेंटिंग ला बुलेट प्रुफ फ्रेम ठेवले गेले.
लिओनार्दो द विंची याने एका चिनारच्या लाकडाच्या पॅनेलवर ऑइल पेंटचा उपयोग करून मोनालिसाचे पेंटिंग बनवले. असे असले तरी या पेंटिंगवर ब्रशची एकही खूण नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार हे जगातील सर्वात महाग पेंटिंग आहे. १९६२ मध्ये याची किंमत १०० मिलियन डॉलर केली गेली. २०१९ मध्ये या पेंटिंगची किंमत सातशे मिलियन डॉलर होती.
योगेश शुक्ला
Yogesh Shukla, 9657701792
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण