(Suvarna Prashan Shabir) प्राशन शिबिराचा आज 18 जुलै रोजी दुसऱ्या मोफत डोसचा 179 बालकांनी घेतला लाभ
(Green Fingers Ayurvedic Hospital and Research Centre Hospital) ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल मध्ये सुवर्णप्राशन शिबीर शुभारंभी 215 बालकांनी घेतला लाभ.

(Suvarna Prashan Shabir) सुवर्ण प्राशन शिबिराचा आज 18 जुलै रोजी दुसऱ्या मोफत डोसचा 179 बालकांनी घेतला लाभ
(Green Fingers Ayurvedic Hospital and Research Centre Hospital) ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल मध्ये
सुवर्णप्राशन शिबीर शुभारंभी 215 बालकांनी घेतला लाभ.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे यांज कडून)
अकलूज दिनांक 18/7/2023 : (Shri Shiv Parvati Sarvjanik Vikas Trust Shankar Nagar Akluj Sanchalit Green Fingers Ayurvedic Hospital and Research Centre Hospital) श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट शंकरनगर अकलूज ट्रस्ट संचलित ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल मध्ये पुष्य नक्षत्रावर सुवर्ण प्राशन शिबिराचा ((Suvarna Prashan Shabir) आज 18 जुलै रोजी दुसरा मोफत डोस आज सुरू झाला आहे. हा डोस तोंडावाटे ड्रॉप ने दिला जातो.मागील शुभारंभाच्या वेळी सुवर्णप्राशन शिबिरात 215 बालकांनी लाभ घेतला.या शिबिराचे उदघाटन विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील (Vishvatejinh Ranjitsinh Mohite-Patil) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते.
समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली आरोग्यविषयक सोयी सुविधांची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट शंकरनगर अकलूज या ट्रस्टने ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे हॉस्पिटल सुरू केले आहे. सदर हॉस्पिटलच्या माध्यमातून ऑक्टोंबर 2022 पासून परिसरातील व तालुक्यातील रुग्णांवर ठराविक उपचार मोफत केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हॉस्पिटलने प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या दिवशी 0 ते 12 वर्षा पर्यंतच्या बालकांना दिले जाणारे सुवर्णप्राशन मोफत मध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात 21 जून रोजी सकाळी 10:00 ते सायं. 05:00 या वेळेत “सुवर्ण प्राशन शिबिर” घेऊन केली. सदर शिबिराचे उद्घाटन विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तत्कालीन शिबिराचे शुभारंभ प्रसंगी परिसरातील 215 बालकांनी मोफत सुवर्ण प्राशना चा लाभ घेतला. सुवर्ण प्राशन (Suvarna Prashan) हे प्रामुख्याने प्रतिकारशक्ती, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिले जाते. तसेच वारंवार होणारे आजार कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. सुवर्ण प्राशन मुलांना सकाळी प्रत्येक पुष्य नक्षत्रावर किमान एक वर्ष दिले जाते. संस्था पुढील एक वर्ष प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या दिवशी मोफत सुवर्ण प्राशन शिबिर घेणार आहे. अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. (Suvarna Prashan Shabir) मोफत सुवर्ण प्राशन शिबीराच्या तारखा 18 व 19 जुलै 2023, 14 ऑगस्ट, 12 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर, 8 नोव्हेंबर, 2 व 29 डिसेंबर 2023. या प्रमाणे आहेत.
आज मंगळवार दि.18 जुलै 2023 रोजी संस्थेचे दुसरे मोफत सुवर्ण प्राशन शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये 179 बालकांनी मोफत सुवर्ण प्राशन चा लाभ घेतला. आजच्या शिबिरास संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील (Hon.Satyprabhadevi Ranjeetsinh Mohite – Patil) यांनी सदिच्छा भेट दिली व लहान मुले आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला.
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये संस्थेचे विश्वस्त, अधिकारी, सर्व डॉक्टर व स्टाफ यांचे मोलाचे योगदान नेहमीच लाभत आहे.