ताज्या घडामोडी

“बेधुंद व्यवस्थेला प्रतिकार करत जगाच्या समोरील सत्य मांडण्याचे काम तुम्ही पत्रकार करता”- माजी न्यायाधीश सचिन जोरे

“बेधुंद व्यवस्थेला प्रतिकार करत जगाच्या समोरील सत्य मांडण्याचे काम तुम्ही पत्रकार करता”- माजी न्यायाधीश सचिन जोरे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 23/03/2024 :
स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षे झाली. पण खऱ्या अर्थाने समाजाची खरी बाजू, समाजातील खरे सत्य लोकांसमोर आणण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजे पत्रकारानी. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, जो निस्वार्थीपणे, निरपेक्षपणे कोणताही दुजाभाव न करता परखडपणे, वास्तविक पाहता कसलेही संरक्षण नसताना देखील “या बेधुंद व्यवस्थेला प्रतिकार करत करत जगाच्या समोरील सत्य मांडण्याचे काम तुम्ही पत्रकार करता”. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. असे मत माजी न्यायाधीश ऍड सचिन जोरे यांनी व्यक्त केले. धनगर शक्ती परिवारा तर्फे आयोजित “राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” वितरण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून आळंदी येथून ते बोलत होते. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन माजी न्यायाधीश एडवोकेट सचिन जोरे, एन.यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, सूत्रबंधन मंगल कार्यालय आळंदी चे संस्थापक विशाल भागवत, क्रांती शौर्य सेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे, उद्योजक हनुमंत दुधाळ, जय मल्हारी युवा संघटना संस्थापक विठ्ठल रुपनवर, बेरळी ग्रामपंचायत सरपंच वेंकटेश नाईक, धनगर शक्ती चे संपादक आकाश पुजारी या मान्यवरांच्या हस्ते झाले.

पुढे बोलताना, मी न्यायाधीश म्हणून काम केले. न्यायाधीश म्हणून काम करत असताना बऱ्याच खटल्यामध्ये, बऱ्याच केसेस मध्ये मी निकाल दिले. परंतु न्यायाधीशांच्या निकालामधून देखील जे काही सत्य कोर्टासमोर रेकॉर्डवर येते त्या आधारावरच निर्णय दिले जातात. परंतु सगळेच सत्य न्यायालयासमोर येतं असं नाही. खोटीबाजू देखील कधीकधी कागदपत्रांवर वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयात येते आणि त्या आधारावर निर्णय दिले जातात. आजही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सांगतात, “न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही. निकाल लागतो पण न्याय मिळतोच असे नाही”. असे सत्य कथन करून, “आपण या प्रचंड अराजकता झालेल्या परिस्थितीत देखील सर्व स्तरावर लोकांची खरी बाजू ही समाजासमोर लेखी मांडता त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन.” अशा शब्दात राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारां चे अभिनंदन करून प्रेरणा दिली.
व्यासपीठावर सर्वप्रथम प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक माजी न्यायाधीश ऍड. सचिन जोरे यांचा “धनगर शक्ती” परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार याचे वितरण झाले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button