एनयूबीसी आयोगाकडून विठ्ठल राजे पवार यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला…

एनयूबीसी आयोगाकडून विठ्ठल राजे पवार यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला…
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
दिल्ली दिनांक 04/01/2024 :
“राष्ट्रीय पिछडा वर्ग (कुणबी,ओबीसी इ.,) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एवं अल्पसंख्यांक महासंघ, विकास मिनार आई पी इस्टेट, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी विठ्ठल पवार राजे यांची नियुक्ती 16 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती. अन्य पिछडा वर्ग आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव व जनरल सेक्रेटरी एस. गीता यांनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यालयात (दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी.) महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदाचा पदभार एनयूबीसी चे, अध्यक्ष जगदिश यादव व जनरल सेक्रेटरी एस गीता यांच्या हस्ते पदभार स्वीकारला.”
“विठ्ठल राजे पवार यांनी महाराष्ट्र राज्यचा पदभार स्वीकारल्या नंतर त्यांना त्या ठिकाणचा आयोगाचे गॅजेट व पत्र व्यवहार सुपूर्त करण्यात आला. आयोगाचे ध्येयधोरणानुसार राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी अनुसूचित जाती-जमाती व अल्पसंख्यांक वर्गातील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये सोई सुविधानाबाबत राज्य सरकारच्या दिग्दर्शनास आणून दिले जाईल. तसेच राष्ट्रीय कार्यालयाकडे वेळोवेळी अहवाल सादर केला जाईल. अन्य पिछडा वर्ग आयोगाने माझ्यावर विश्वास ठेवून माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी आयोगाचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे, यापुढे महाराष्ट्र राज्यातील अन्न अन्य पिछडा वर्ग, मागास, आर्थिक मागास ओबीसी कुणबी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता एन यू बी सी कडून घेतली जाईल. तसेच महाराष्ट्र राज्यातील सहा विभाग व 36 जिल्हे तसेच साडेतीनशे तालुक्यांमध्ये सर्व वर्गातील अध्यक्ष उपाध्यक्ष व सेक्रेटरी पदांची यांची जानेवारी 2024 महिनाभरात राज्यातील सर्व तालुका जिल्हा व विभाग व अध्यक्ष (महिला व पुरुष) यांच्या नियुक्त करण्यात येतील. तसेच, ए न्यू बीसी च्या विभाग तालुका जिल्हा अध्यक्ष पदासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या इच्छुकांनी पुणे महाराष्ट्र राज्यातील केशवनगर मुंढवा पुणे 36 येथील प्रदेश कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आव्हान यावेळी विठ्ठल पवार राजे यांनी बोलतांना सांगितले.,,
“यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर बोलताना आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी श्रीमती एस गीता, शरद जोशी विचारमंच राष्ट्रीय किसान संघटनेचे नवी दिल्ली प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश उर्फ जे पी चौधरी, उत्तर भारत विभागाचे अध्यक्ष आशिष कारखानिष, रमेशादेवी अंतील हरियाणा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय लीगल ॲडव्हायझर उपाध्यक्ष एडवोकेट कमलजीत सिंह राणावत उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय पिछडा (ओबीसी इ.) वर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक आयोगाच्या विभागातील पदाधिकारी उपस्थित होते त्यांचे उपस्थितीत सोमवार दिनांक 4 डिसेंबर2023 रोजी विठ्ठल पवार राजे यांनी आयोगाच्या कडून महाराष्ट्र राज्याच्या (चेअरमन) अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.,,
विठ्ठल पवार राजे यांची एनयूबीसी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल विविध संघटनांच्या व लाखो शेतकऱ्यांकडून त्यांचे स्वागत होत आहे…
“राष्ट्रीय पिछडावर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्यांक क्षेत्रातील नागरिकांनी व या वर्गात सामाजिक काम केलेल्या इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य पुणे येथील कार्यालयाची भ्रमणध्वनी 7887313311 अथवा ईमेल nubc.vprpresidentms@gmail.com या ऍड्रेसवर आपला बायोडाटा व तक्रारी नोंदवाव्यात असे आव्हान यावेळी एन यू बी सी चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी केले आहे,,