धनगर आरक्षण आंदोलनातून धनगरांच शक्ती प्रदर्शन!

धनगर आरक्षण आंदोलनातून
धनगरांच शक्ती प्रदर्शन!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 30/11/2023 : महाराष्ट्रात अनेक तालुके असे आहेत जिथे धनगरांची संख्या जास्त आहे. पण तिथं हुकूमत धनगरांची नाही तर धनगर तिथे दुसऱ्याच्या हुकमाचे ताबेदार आहेत. म्हनून आपले आमदार खासदार निवडून येत नाहीत. Zp, पंचायत समितीत, ग्राम पंचायतीत सुद्धा धनगर नावाला असतात. त्याचा परिणाम असा आहे कीं, राज्यात क्रमांक दोनचा समाज असून सुद्धा 75 वर्षांत एकही खासदार निवडून आला नाही. 288 आमदार असलेल्या विधानसभेत एक धनगर आमदार निवडून आला. काय करायच! धनगर आरक्षणावर कोणी काही बोलत नाही. जरांगे पाटील यांनी दीड दोन महिन्यात दहशत निर्माण केली त्याच्या अर्धी दहशतही आपण 70 वर्ष लढून मिळवू शकलो नाही.
मेळावे, मोर्चे, आंदोलनात मात्र धनगर यशस्वी होतात. पण एक नेता नाही. धनगरी जत्रा नी कारभारी सत्रा ही अवस्था अजूनही आहे तशीच आहे. आरक्षण विषयावर अनेक वर्ष समाज आंदोलन करत आहे. पण परिणाम शून्य. त्यात प्रमाणिक नेता मिळत नाही. म्हणून काही लबाड नेते सत्तेची पद घेऊन समाज विकतात. काही पैसे घेऊन समाज लुटतात. ही वाटमारी 70 वर्ष सुरु आहे. पण धनगर आंदोलन मात्र अखंड पणे सुरु आहे. त्यात आमरण उपोषण अनेक जागी यशस्वी झाली, जोरदार झाली पण परिणाम काहीच नाही.
या वर्षी एक अनोखा आंदोलन धनगर समाजानी केलं. गावबंद केलं. पहिली सुरवात बारामतीतून झाली. बारामती बंदचीं जेंव्हा धनगर संघटनानी घोषणा केली तेंव्हा माझ्या पोटात धस झालं. एक तर आख्या गावात धनगराची दुकान किती 2/4 ईतर दुकानं दुसऱ्यांची. ती धनगर आरक्षणासाठी कशी बंद ठेवणार. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत, धरणे आंदोलणे मोर्चे काढा. पण शहर बंद करू नये. आपलं कोणी ऐकणार नाही. बंदचीं हाक देऊन शहर बंद झालं नाही तर उगाच हस होईल. आणि तेही बारामती शहर बंद? हुकूमत सर्वं पावाराची. बारामती बंद करणं काही खेळ नाही.
पण बंदचा दिवस उजाडला आणि टीव्ही वर बारामती बंदच्या बातम्या झळकल्या. आख्ख शहर बंद. बाजार पेठेत सर्वत्र शुक शुकाट. ती बंद दुकान पाहून हायस वाटलं. धनगरानी पहिली लढाई जिंकली. बारामती पाठोपाठ मग धनगरानी इंदापूर बंदची घोषणा केली. तोही यशस्वी झाला. नंतर खंडाळा बंदचीं घोषणा केली. खंडाळा म्हणजे पारगाव खंडाळा जि सातारा. खंडाळा बंद सुद्धा कामालीचा यशस्वी झाला. सर्वं बाजार बंद. बारामती, इंदापूर आणि खंडाळा यां तीन्ही जागी धनगर संख्या मोठी आहे. अशी अनेक गाव आहेत जिथं धनगर मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वं गावात नीट नियोजन करून बंद पाळला तर, आपलं बळ सरकारला कळेल. आपली एकी वाढेल त्याच फळ प्रत्येक क्षेत्रात मिळेल.
पुणे जिल्हा दौंड, शिरूर, सातारा जिल्ह्यात, मान, खटाव, दहिवडी, लोणंद, फलटण, सांगली जिल्ह्यात, जत, मिरज, आटपाडी, ढालगाव, डफळापूर, तासगाव, खानापूर, विटा, कवठेमहांकाळ सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, माढा, मंगळवेढा, सोलापूर, सांगोला, कुर्डुवाडी, मोहोळ, करमाळा, उस्मानांबाद जिल्हा, तुळजापूर, भूम, परांडा, नगर जिल्हा, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, संगमनेर एवढी शहर तर आपण हमखास बंद करू शकतो. करा नियोजन आणि आंदोलनासाठी पुकारा शहर बंद. अजून काही गाव असतील तर तीही जोडा. सरकारला घाम फुटल्या शिवाय रहाणार नाही. सरकारला आपला वाटा द्यावा लागेल.
बापू हटकर