ताज्या घडामोडी

ते 17 दिवस

प्रसंगिक…..✍️

ते 17 दिवस

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 29/11/2023 :
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी एका इंग्रजी कादंबरीचा जी खरीखुरी घटना होती त्यावरील ते 70 दिवस म्हणून मराठी अनुवाद माझ्या वाचनात आला होता. ही कादंबरी माझ्या आयुष्यात मला नेहमी मनोबल व धैर्य देणारी कादंबरी होती.
माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण ते 70 दिवस ही कादंबरी मुद्दाम म्हणून वाचावी.
आज मला या कादंबरीची आठवण येण्याचे कारण म्हणजे उत्तराखंड येथील बोगद्यामध्ये गेले सतरा दिवस अडकलेल्या 41 मजुरांची आज तासा भरापूर्वी यशस्वी सुटका झाली आहे
आपण एखाद्या बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर अगर, अन्य ठिकाणी सतरा मिनिटे वाट पाहू शकत नाही अस्वस्थ होतो सर्वांना मनोमन शिव्या शाप देऊ लागतो. मात्र हे 41 मजूर 17 दिवस बोगद्यामध्ये अडकून पडले होते. त्यांची मनस्थिती, धैर्य, साहस, सहनशीलता याचे करावे तेवढे कौतुक अपुरे आहे.
🟣समजा उलटे झाले असते तर
विकाऊ मीडिया केजरीवाल पासून राहुल गांधी पर्यंत, ममता बॅनर्जी पासून नितीश कुमार पर्यंत ,फारूक अब्दुल्ला पासून ओवीसी पर्यंत ,कुमार केतकर पासून कुमार सप्तर्षी पर्यंत ,प्रियंका गांधी पासून सुप्रिया सुळे पर्यंत, विश्व प्रवक्ते राऊत पासून उद्धव ठाकरे पर्यंत या सर्वांनी मोदी व भारत सरकार यांच्या बद्दल मोठा उठाव केला असता. छात्या पिटून बोंबाबोंब केली असती.
मोदींच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा
मोदी यांच्या विरुद्ध व उत्तराखंडचे मुख्यमंत्री चे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा कांगावा केला असता. उरफोड केली असती.मी गेले दोन तास निरनिराळ्या चॅनलवर बातम्या पहात आहे. या 41 मजुरांची झालेली सुटका याबद्दल एकाही विरोधी पक्षातील नेत्यांनी साधे उद्गार काढले नाहीत ,ट्विट केले नाही. मदत कार्यात असणाऱ्या जवानांचे आभार मानले नाहीत अगर अभिनंदन केले नाही.
गेली अनेक वर्षे सत्तेच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरून घेतलेले हे नेते यांच्यात एवढी सुद्धा दानत नाही की या मदत कार्यात सहभागी असणाऱ्या जवानांना अगर अडकलेल्या 41 कामगारांना मदत म्हणून एक रुपया जाहीर करण्याची यांची मनोवृत्ती नाही
निर्लज्ज मराठी मिडीया
मराठी मीडिया च्या संपादकानी तर लाज सोडली आहे. देशात एवढी मोठी अभिमानास्पद घटना घडली असताना मराठी मीडिया आरक्षण, कोण काय म्हणाले यावर कव्हरेज देत आहे.
तोंडाला टाळे
छोट्या मोठ्या गोष्टीवर रोहित पवारांच्या पासून शरद पवारांच्या पर्यंत टिका टिपणी करणारी नेते यांचे तोंडाला टाळे लावलेले आहे.
हे बेजबाबदार विरोधी पक्ष व विरोधी नेते यांना या देशातील शेतकरी ,मजूर, जवान यांच्या बद्दल काहीही देणे घेणे नाही.
त्यांना फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच सत्ता हवी आहे. असे नेते फक्त भारतातच असू शकतात. असो.
शत:श वंदन
गेले 17 दिवस रात्रंदिवस अपार परिश्रम करून 41 मजुरांना वाचवणारे सर्व कर्मचारी ,तज्ञ व राजकीय शक्ती इच्छाशक्ती याना शतशः वंदन !

ॲड अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button