क्रांती दिनानिमित्त फिनिक्स इंग्लिश स्कूलची मुलं अवतरली महापुरुषांच्या वेशभूषेत.

क्रांती दिनानिमित्त फिनिक्स इंग्लिश स्कूलची मुलं अवतरली महापुरुषांच्या वेशभूषेत.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 9/8/2023 : माळशिरस तालुक्यातील लवंग (२५/४) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूल येथे ९ ऑगस्ट क्रांतीदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील चिमुकल्या मुलांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करून आले होते.त्यामुळे आजचा दिवस मुलांनी आगळावेगळा साजरा केला.
क्रांतिदिवस म्हणजे काय ? या दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे अनेक क्रांतिवीरांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली ब्रिटिशांच्या साखळदंडातून भरत मातेस मुक्त केले.महात्मा गांधीजीं यांचा करा किंवा मरा,चले जाव या घोषनेने संम्पूर्ण देश खवळून उठला करेंगे या मरेंगे म्हणीत देशातील सर्वसामान्य जनता ही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पेटून उठली.तो दिवस म्हणजे ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीची लाट उसळली होती.ब्रिटिशांनी भारतीयांच्या प्रयत्नासमोर माघार घेतली.या भारत देशावर राज्य करणे आता शक्य नाही याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी आपल्या देशातून काढता पाय घेतला.आणी भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला.थोर समाजसेवक,क्रांतिवीर या महापूरुषांच्या प्रयत्नांमुळे आपन आज स्वतंत्र्य उपभोगत आहोत त्यामुळे सर्व क्रांतिवीर स्वातंत्र्य सेनानी आमचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहेत.
त्या महामानवांच्या वेशभूषेचे अनुक्ररण करून फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या बालकांनी गावातून रॅली काढून भारत माता की जय,वंन्दे मातरम अशा घोषणा देत क्रांतिदिवस साजरा केला.या वेळी बालकांनी वेगवेगळ्या महामानवांच्या वेशभूषा भारत माता आणि तिचे रक्षणकर्ते सैनिक महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले, लाल बहाद्दूर शास्त्री, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिहं, इंदिरा गांधी, मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचीं वेशभूषा साकारून या देशभक्ताना मानवदंना देऊन त्यांनी केलेल्या त्याग बलिदानाचा आम्हास विसर पडणार नाही अशी देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.या वेळी रस्त्याने ये जा करणारे नागरिक या मुलांच्या रॅलीकडे कुतूहलाने पहात होते.या रॅलीमध्ये पोलीस हवालदार कुंभार, पो.कॉ.तांबोळी, पो.कॉ.पवार यांनाही या देशभक्त बालकांकडे पाहून कौतुक केले. आपली गाडी थांबवुन या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होऊन जय हिंद भारत माता की जय म्हणत विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून आपले देशभक्तांविषयीचे प्रेम व्यक्त केले .
या प्रसंगी फिनिक्स स्कूलच्या संचालिका सौ. नुरजहाँ फकृद्दीन शेख म्हणाल्या की, बालकांच्या सर्वांगीण विकासा बरोबर वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांच्यात देशभक्तीची बीजे बालमनात रुजवली गेली तरच आजचा बालक उद्याचा उत्तम नागरिक होणार आहे.
या प्रसंगी ब्राह्मचैतन्य इंग्लिश स्कूल तांदूळवाडीचे संस्थापक संजय मोहिते, समाधान जगताप, गुलशन शेख पालक संघाचे अध्यक्ष रेवन भोळे, उपाध्यक्ष रामचंद्र चव्हाण व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी शंकर (अण्णा) पराडे व सोमनाथ राऊत यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.