ताज्या घडामोडी

विचारात पाडणारी बातमी.

विचारात पाडणारी बातमी.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 27/12/2023 :
ज्येष्ठ पत्रकार, अंतर्नादचे एक लेखक आणि माझे स्नेही एकनाथ बागूल यांचे एकुलते एक चिरंजीव अनिरुद्ध यांचा मृतदेह पुण्याच्या पत्रकारनगरमधील त्यांचा घरात सापडल्याची बातमी दैनिकामध्ये वाचली आणि खूपच धक्का बसला. अनिरुद्ध जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रासाठी छायाचित्रण करत आणि वय फक्त ५१ होते. वडील एकनाथराव ऐंशीच्या घरात असून सध्या पत्नीच्या निधनानंतर कोथरूडमधील एका वृद्धाश्रमात एकटेच राहत आहेत. सकाळमधील बातमीनुसार अनिरुद्ध यांचे निधन आठएक दिवसांपूर्वी झाले असावे.
गेले आठ दिवस सदनिकेचा दरवाजा बंद होता. बाहेर खूप दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यावर पोलीस आले व पोलिसांनी दार फोडले तेव्हा आत पलंगावर कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळले.
पण मला अधिक वाईट वाटले ते याचे की आठ दिवस अनिरुद्ध घरात मरून पडलेले असूनही कोणाही शेजाऱ्यांना त्याबाबत काही करावेसे वाटले नाही याचे. सदनिकेसमोर वृत्तपत्रांचा ढीग जमला असूनही कोणी चौकशी का केली नाही?
या पत्रकारनगरात माझ्या माहितीनुसार १६ इमारती असून एकूण ११२ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिका कोणातरी पत्रकाराची आहे. अनिल अवचट, सदा डुंबरे इथेच राहत. सुरेशचंद्र पाध्ये, ऋता बावडेकर, जयराम देसाई वगैरे अनेक पत्रकार आजही इथेच राहतात. इथे राहणाऱ्या नामवंतांनी यादी बरीच मोठी होईल. ही सर्व लेखक आणि विचारवंत मंडळी. सतत जागरूक नागरिकता आणि सामाजिक बांधिलकीच्या गप्पा मारणारी. पण तरी इथे इतकी अनास्था कशी? १९८०पासून म्हणजे जवळपास गेली चाळीस वर्षे ही सर्व पत्रकार मंडळी इथे राहत आहेत, बहुतेक सगळ्यांना सगळे चांगले ओळखत असणार. तरी असे कसे घडू शकते?
आजच्या आभासी जगात, मोबाइलभोवतीच आपले आयुष्य सीमित झाले आहे का? माणूस माणसापासून असा तुटत गेला तर एक समाज म्हणून काहीअस्तित्व टिकेल का? का तीही केवळ एक आभासी संकल्पना असेल? अतिशय दुःखद आणि तितकीच विचारात पाडणारी बातमी.

भानू काळे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button