ताज्या घडामोडी

सरकारने शेतकरी कष्टकरी पिछडा वर्गाला रस्त्यावर उतरवयाची वेळ येऊ देऊ नये… विठ्ठल राजे पवार यांचा इशारा.

🟢 "तर सरकार विरुद्ध कंटेंट ऑफ कोर्ट याचिका दाखल करू", २०२४ चे संयुक्त राष्ट्रीय परिषदेत संघटनेची गर्जना,"सरकारने, उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, सरकार कायदा पायदळी तुडवत आहे, म्हणून न्यायालयात गेलो, संयुक्त राष्ट्रीय परिषदेत १५ विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा २१ वा, राष्ट्ररत्न युद्ध शेतकरी व कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला

सरकारने शेतकरी कष्टकरी पिछडा वर्गाला रस्त्यावर उतरवयाची वेळ येऊ देऊ नये… विठ्ठल राजे पवार यांचा इशारा.

🟢 “तर सरकार विरुद्ध कंटेंट ऑफ कोर्ट याचिका दाखल करू”, २०२४ चे संयुक्त राष्ट्रीय परिषदेत संघटनेची गर्जना,”सरकारने, उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, सरकार कायदा पायदळी तुडवत आहे, म्हणून न्यायालयात गेलो, संयुक्त राष्ट्रीय परिषदेत १५ विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा २१ वा, राष्ट्ररत्न युद्ध शेतकरी व कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज/पुणे दिनांक 20/01/2024 :
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व महासंघ नवी दिल्ली व राष्ट्रीय पीछडावर्ग अनुसूचित जाती जनजाती अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली, ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन ट्रस्टच्या संयुक्त परिषदेचे पुण्यात शानदार उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले, यावेळ परिषदेचे अध्यक्ष जगदीश जी यादव चेअरमन ओबीसी कमिशन गव्हर्मेंट ऑफ एन सी टी दिल्ली. यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्रीय परिषद संपन्न झाली, या परिषदेचे परिषदेत प्रास्ताविक मांडताना १९ विषयांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे राज्य सरकार कायदा पाळत नाही म्हणून शेतकरी संघटना तो सन्मानाने हातात घेईल वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोड याचिका दाखल करून शेतकरी व गरजवंत समाजाला न्याय देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू असा सक्त इशारा परिषदेचे प्रस्ताविकात विठ्ठल पवार राजे यांनी दिला, ते म्हणाले की संघटनेने संयुक्त राष्ट्रीय परिषदचे आयोजन केलेले आहे या परिषदेसाठी देशभरातील १९ राज्यातील संघटनांचे अध्यक्ष व १६७ संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झालेले आहेत. सरकारने कायदे पाळावेत कायद्याचे पालन करावे घटनेच्या कलम १६२ पालन करावे उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाचा राज्य सरकारने अध्यादेश जारी करून शेतकरी कष्टकरी पिछडा वर्गांना न्याय द्यावा अन्यथा सरकारच्या विरोधात कंटेंट ऑफ कोट तर देशपातळीवरती मोठ्या आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळेस राजे पवार यांनी दिला आहे, परिषदेचे अध्यक्षस्थानी एन यू बी सी, व गव्हर्नमेंट ऑफ एन.सी.टी. दिल्ली आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव तर परिषदेचे उद्घाघाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस उपस्थित होते.


या परिषदेमध्ये मराठा सेवा संघाचे प्रदेश समन्वय किल्ले संवर्धक इंजिनियर राजेंद्र कुंजीर, अ.भा.म. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, शेतीसोबत मानवी मनाची मशागत करणारा प्रख्यात नटसम्राट फुलचंद नागटिळक, सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकारी संचालक इंजिनियर रमाकांत नाईक, अनंत निकम, ज्येष्ठ पत्रकार ए एम खान, आशिष कारखानिष, उमा देशपांडे, सौ सुषमा पाचंगणे आदींना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस व आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव यांच्या हस्ते विठ्ठल पवार राजे अध्यक्ष व राष्ट्रीय सेक्रेटरी जनरल एस गीता तामिळनाडू यांच्या प्रमुख उपस्थित कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिषदेचे आयोजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केले होते यावेळी संयुक्त राष्ट्रीय परिषद व संघटनेच्या वतीने १९ विविध मागण्यांचे ठराव आयोजक विठ्ठल राजे पवार यांनी मांडले त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश यादव राष्ट्रीय सेक्रेटरी जनरल एस गीता व संमेलनाचे परिषदेचे उद्घाटन डॉक्टर श्रीपाल सबनीस, श्री विठ्ठल राजे पवार यांच्या सह सर्व जिल्हा अध्यक्षांच्या सह्यांचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आल्याची माहिती संघटनेचे संयोजक विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.


यावेळी अध्यक्ष भाषणात जगदीश यादव म्हणाले की भारतातील शेतकरी कष्टकरी कामगार ओबीसी कुणबी पिछडावर्ग समाजावर सातत्याने अन्याय केलेला आहे. त्यांना त्यांच्या हक्काचं काहीही मिळत नाही त्यांच्या हक्कासाठी किसान संघटन आणि एनयूबीसी देश पातळीवर संयुक्त आंदोलन लवकरच उभारेल जाईल आणि सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देईल. लवकरच देशभरातील ३६ राज्यांची संयुक्त परिषद नवी दिल्ली येथे भरवण्यात येईल असे यावेळी जगदीश यादव यांनी सांगितले. ते म्हणाले की राष्ट्रीय पीछडावर्ग किसान यांचे न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.


परिषदेचे उद्घाटक प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत देशातला शेतकरी आत्महत्या का करतो आहे तो लुटला जात आहे म्हणून तो आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बेस रेट मिळण्यासाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने आज राष्ट्रीय संयुक्त परिषदेचे आयोजन केलेले आहे आणि या परिषदेमध्ये देशभरातील १९ राज्याचे अध्यक्ष आणि संघटनेचे दोन्ही राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हातात घेतलेला निर्णय अत्यंत प्रभावी असून आपण शेतकरी कुणबी पिछडावर्ग घटकांसाठी सातत्याने प्रयत्न करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी कोर्टातून अनेक निकाल मिळवलेले आहेत त्यांच्या कार्याचे निश्चितपणे कौतुक करतो, शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतमालाला बेस रेट मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कृषी किंमत न्यायाधीकरणाची स्थापना करावी, त्यासाठी विठ्ठल राजे पवार यांनी श्रद्धेय शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशींचा वारसा हा सक्षमपणे देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चालवलेला असून आज १९ एकोणीस राज्यातल्या उपस्थित असलेल्या अध्यक्षांची उपस्थिती त्याचे फलित आहे, त्याचा हे जिवंत उदाहरण आहे. संघटनेसह राज्यातील 167 संघटनांची मोट बांधूने सोपं नाही, शरद जोशींच्या सक्षम नेतृत्वात तयार झालेल्या विठ्ठलरावांनी देशभरातील शेतकऱ्यांची सक्षम पणे मोट बांधून देशभरातील शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च भरून निघेल इतका शेतमालाला बेसरेट मिळावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन योग्य असून आपण या आंदोलनाच्या मागण्याचं समर्थन करतो असे डॉक्टर सबनीस यांनी सांगितले.
यावेळी संघटनेच्या आणि एन यू बी सीच्या वतीने देशपातळी आणि राज्यभरातील पंधरा शेतकरी सामाजिक कार्यातील प्रतिनिधींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये इंजिनिअर राजेंद्र कुंजीर यांना पुणे रत्न तर फुलचंद नागटिळक यांना शेतीसोबत मानवी मनाची मशागत करणारा प्रख्यात ग्रामीण नटसम्राट कृषिरत्न पुरस्कार, सहकार क्षेत्रातील आर एस नाईक यांना सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकारी संचालक कृषिरत्न सहकारी संस्था चालवत इथेनॉल व पावर एनर्जी मोल्यासेस इ. कार्याबद्दल विशेष कृषिरत्न पुरस्कार, तर अनंत व्हीं निकम यांना उत्कृष्ट एमडी (निवृत्त), माननीय सौ उमा देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार एम खान, संघटनेच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस गीता व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, सौ सुषमा संतोष पाचांगणे यांना विशेष सन्मानाने आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव व डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी किसान संघटन महासंघ व एनयूबीसी च्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या एनयूबीसीच्या प्रदेशाध्यक्षपदी विठ्ठल राजे पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल संयुक्त संघटनांच्या वतीने माननीय जगदीश यादव, डॉ श्रीपाल सबनीस, अंबादास कोरडे पाटील, शरद गोरे, प्रकाश पोरवाल, राहुल घोडके, बाळासाहेब वर्पे, पंढरीनाथ कोतकर संदीप गवारे दादा पाटील राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस गीता व उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
🔸या परिषदेला देशभरातून उपस्थित असलेले एकोणीस राज्यांच्या अध्यक्षांमध्ये दिल्ली हेमंत यादव, राजेंद्र कुमार गुडगाव, जय किसान ठाकूर हरियाणा, लक्ष्मण शिंग उत्तर प्रदेश, सुब्रमण्यम तामिळनाडू , डॉक्टर सुवर्ण कुमार केरला, युएसएसआर नटराजन तामिळनाडू, राजपाल मीना राजस्थान, विपुल जी मकवाना, गुजरात दीपक गौडा ओरिसा, डॉक्टर नवीन पांडूचेरी , सुब्रोतो मोदक वेस्ट बंगाल, सय्यद अबू ताहीर तामिळनाडू, एडवोकेट कमल कंनन तामिळनाडू , मद्रास एस अशोक, सौ रमा लक्ष्मी केरला, प्रोफेसर अब्दुल रशीद जम्मू काश्मीर, एस गीता जनरल सेक्रेटरी राष्ट्रीय, उत्तर भारत अध्यक्ष आशिष कारखानीस, जीडी इनामदार कर्नाटक, इनुस आलम सिद्दिकी महाराष्ट्र, अंबादास कोरडे पाटील प्रदेशाध्यक्ष, एडवोकेट राजन दीक्षित राष्ट्रीय उपाध्यक्ष सोलापूर, एम परमेश्वरी तामिळनाडू आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🔷यावेळी शेतकरी संघटना व एनयूबीसीच्या ७२ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आयोगाचे अध्यक्ष जगदीश जी यादव व गीता सेक्रेटरी जनरल तसेच संघटनेचे अध्यक्ष राजे पवार व परिषदेचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध सेलच्या उपाध्यक्षपदी पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यात श्री प्रकाश पोरवाल प्रदेश उपाध्यक्ष, अंबादास कोरडे पाटील प्रदेश समन्वयक, अहमदनगर राहुल घोडके पाटील प्रदेश उपाध्यक्ष तर

प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे अकलूज सोलापूर, प्रदीप दिव्यविर मराठवाडा खान्देश, एम खान पुणे कोकण, डॉक्टर बळीराम वाव्हळ पश्चिम मद्य महाराष्ट्र यांच्या नियुक्ती करण्यात आल्या तसेच जिल्हा अध्यक्षपदी पंढरीनाथ कोतकर नगर, महेश बिस्किटे पंढरपूर, संदीप गवारे पूर्व नगर, दादा नामदे उत्तर नगर, रोहित पिसे बारामती विभाग, आरिफ इस्माईल मेमन पुणे, आरिफ सिद्दिकी औरंगाबाद, रवी राणा पवार पश्चिम महाराष्ट्र, बाळासाहेब वर्पे पुणे जिल्हा, विठ्ठल लोखंडे खेड राजगुरुनगर फुलचंद नागटिळक सोलापूर विभाग, अनील भांडवलकर पुणे जिल्हा युवक, महेश गिरी हडपसर युवक यांच्याही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तसेच महिला पदाधिकारी पदी, सौ मीना सोनवणे, सौ शामल कलगुटकर, सौ सुषमा पाचरणे पुणे जिल्हा, सौ माधुरी पाटील नागपुर, उमा देशपांडे महाराष्ट्र महिला, आशिष कारखानीस उत्तर भारत, यांच्यासह एकूण ७२ प्रतिनिधींच्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.

महत्त्वाचे ठराव खालील प्रमाणे.
संयुक्त राष्ट्रीय परिषदेमध्ये एकूण १९ ठराव मांडण्यात आले त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश यादव विठ्ठल पवार राजे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अस गीता व डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या सह सर्व अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१)महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतमालाला बेस रेट विक्री किंमत (साखरेच्या बेस रेट प्रमाणे ) उत्पादन खर्च अधिक सी टू ५०% किंमत मिळाली पाहिजे, राज्य सरकारने तशा स्वरूपाचे अध्यादेश जारी करावेत.
२) राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली ३१५० रुपये एफआरपी विना कपात मिळावी तसेच फर्स्ट केन प्राइस किमान ३६२६/- रुपये + ५० टक्के नफा मिळावा.
३) दुधाचा उत्पादन खर्च भरून निघाली इतका गाईचे ४८ रुपये व म्हशीचे ५८ रुपये दर अधिक केंद्र सरकारने जाहीर केलेला विद्यापीठांनी दिलेल्या उत्पादन खर्चाचे प्रमाणे बेस रेट दर व नफा मिळावा.
४) राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी किंमत न्यायाधीकरणाची स्थापना करावी. तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सिबिलची अट रद्द करावी.
५) ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन ट्रस्टने स्थापन केलेल्या, “महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ,, ला राज्य सरकारने मान्यता द्यावी.
६) ओबीसी कमिशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र राज्य NUBC आयोग स्थापन करावा त्याला राज्य सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी.
७) सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कुणबी गरजवंत मराठा समाजाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक हितासाठी सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीला संघटनांचा व एन्यूबीसी महासंघाचा जाहीर पाठिंब.
८) माननीय मुंबई उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोग यांनी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या जनहित याचिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षेच्या हेतूने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, त्यात दूध, अन्नधान्य, ऊस, कृषी पंप धारक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सलग दिवसा कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा व विद्युत पुरवठा खंडित न करण्याच्या आदेश, शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल इतका किमान बेस रेट इत्यादी च्या निर्णयाची राज्य सरकारने शासन अध्यादेश जाहीर करावा.
९) ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कृषी उद्योगाचे माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, शहराकडे वाढणारा लोंढा थांबवून गावाकडील बकालीकरण समृद्ध करण्यासाठी स्मार्ट ग्राम योजना सुरू करावी. यास १९ मागण्यांचे निवेदन राज्य व केंद्र सरकारकडे पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर मार्फत पाठवलेले आहे अशी माहिती राष्ट्रीय संयुक्त परिसंस्थेचे आयोजक व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी दिली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button