ताज्या घडामोडी

रानभाजी – अमरकंद

रानभाजी – अमरकंद

शास्त्रीय नाव : लॅ. युलोफिया
कुळ : ऑर्किडेसी
इतर नावे : अंबरकंद, मानकंद

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/9/ 2024 
अमरकंद ही कंद प्रकारातील औषधी वनस्पती भारतात उष्णकटिबंधीय हिमालयात, दख्खन मध्ये व कोकणाच्या दक्षिणेस आढळते. तसेच ब्रह्मदेश, श्रीलंका व चीन इ. देशांत तिचा प्रसार आहे. तिचे गाठदार मूळ बटाट्याएवढे लहान, गोल व गुळगुळीत असते. ह्याच्या बाजूने वाढलेल्या पानांच्या तळाशी खोबणी सारख्या, आवरक (वेढणाऱ्या), देठांचा खोडासारखा भाग बनतो; पाने साधी, लांब, तलवारी सारखी; फुले ९-२० विरळ मंजरीत खोडाच्या तळापासून जून मध्ये येतात. संदले हिरवट जांभळी व प्रदले पांढरी असून ओठाच्या पाकळीचा भाग पांढरा किंवा पिवळा व त्याला गुलाबी किंवा जाभळट झाक असते; बोंड लांबट असून त्यावरच्या शिरा ठळकपणे दिसतात. मूळ हे अर्बुद (शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे झालेली निरुपयोगी गाठ), गंडमाळा, श्वासनलिकादाह, रक्तविकार इत्यादींवर गुणकारी व कृमिनाशक असते. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ऑर्किडेसी कुलात वर्णिल्या प्रमाणे. हिवाळ्याच्या मध्यापर्यंत पाने व फुले संपल्यावर गाठदार मुळे किंवा खोड जमिनीतून काढून अंकूर फुटेपर्यंत प्रसुप्तावस्थेत (निष्क्रीय अवस्थेत) कोरड्या, परंतु उबदार ठिकाणी ठेवतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस कुंड्यांमध्ये दुमट माती, चांगले कुजलेले शेणखत व थोडी रेती यांचे मिश्रण पाण्याचा निचरा होईल असे भरून त्यात ही लावतात. अंकुर वाढू लागून कार्यक्षम मुळ्या जोरदार वाढेपर्यंत बेताबेतानेच पाणी देतात. पूर्ण वाढ झाल्यावर थोडेथोडे खत पाण्याबरोबर मिसळून देतात. कोवळ्या पालवीवर उन्हाचा वाईट परिमाम होऊ नये म्हणून ती आल्याबरोबर सावली करतात. जुन्या मुळांचे किंवा खोडांचे तुकडे करून कुंड्यांत लावून झाडांची संख्या वाढवितात.
औषधी उपयोग
# या वनस्पतीच्या वापराने सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी कायमची दूर होते.
# हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
# भरपूर प्रमाणात पोषक घटक आहेत ज्यामुळे शरीराला याचा बराच फायदा होतो आणि नैसर्गिक असल्यामुळे याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम नाही.
# घेण्याची पद्धत – १ कंद १ ग्लास गरम दूध किंवा पाण्यासोबत सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर एका तासाने घेणे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश/ज.वि.जमदाडे
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button