दहिगाव मध्ये शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न

दहिगाव मध्ये शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/12/2024 : श्री १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव संचलित, विलासचंद्र एम. मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) दहिगाव मध्ये शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील हा पहिलाच मेळावा होता. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष अमृतलाल गांधी व रोनक चंकेश्वरा उपस्थित होते.
सदर प्रसंगी बोलताना अनंतलाल दोशी म्हणाले विद्यार्थ्यांची प्रगती अत्यंत समाधानकारक आहे. अत्यंत कमी वेळामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रगती करून घेतलेली आहे. भविष्यात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. तदनंतर बोलताना रत्नत्रय अकॅडमी चे चेअरमन रोनक चंकेश्वरा म्हणाले विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये संवाद साधला जातो. हा संवाद विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तदनंतर आयटीआयचे प्राचार्य गजेश जगताप यांनी आयटीआय मधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख मांडला व यापुढे बंद असलेले तीन ट्रेड चालू करण्याचे व यावर्षी शासकीय स्कॉलरशिप चालू करण्यात आलेली आहे असे सांगितले. पालक श्रीकांत कुलकर्णी यांनी आयटीआय मधील सर्व शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष आहे असे सांगितले. विद्यार्थी उत्कर्ष साळवे यांने आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कोषाध्यक्ष अमृतलाल गांधी, आयटीआय चे प्राचार्य गजेश जगताप, शिवराम नाळे, निलेश शेंडे, गणेश खंडागळे , पूजा चव्हाण , शुभांगी जाधव , सुभाष शिरतोडे, सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नत्रय अकॅडमीचे मुख्याध्यापक सतीश हांगे यांनी केले.
साप्ताहिक अकलूज वैभव