सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान जनजागृती उपक्रमाचे आयोजन

सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान जनजागृती उपक्रमाचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/02/2025 : अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 25 फेब्रुवारी 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान जनजागृती उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. एनएसएस स्वयंसेवकांनी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानाची गरज, रक्तदात्याला त्याचे फायदे, कोण रक्तदान करू शकतो आणि कोणत्या परिस्थितीत रक्तदान करता येत नाही याबद्दल जनजागृती केली. एनएसएस स्वयंसेवकांनी रक्तदानाशी संबंधित चित्रे आणि संदेश असलेली पोस्टर्स सादर केली. एनएसएस स्वयंसेवकांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत रक्तदान आणि त्याचे फायदे यावर माहितीपूर्ण भाषण दिले.. या कार्यक्रमात शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी व विभाग प्रमुख डॉ. सविता सातपुते आणि एनएसएस स्वयंसेवक व महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयशीला मनोहर, डॉ. छाया भिसे, डॉ.ऋषी गजभिये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएसच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.भारती भोसले यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमात एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाल्या होत्या.