नागपूर – पणजी (गोवा) या नवीन महामार्गाच्या आखणीत तीर्थक्षेत्रांचा समावेश व्हावा : आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांची मागणी

नागपूर – पणजी (गोवा) या नवीन महामार्गाच्या आखणीत तीर्थक्षेत्रांचा समावेश व्हावा : आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांची मागणी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(आकाश भाग्यवंत नायकुडे)
मुंबई दिनांक 4/8/2023 :
नागपूर – पणजी (गोवा) या नवीन महामार्गाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या प्रस्तावित महामार्गात नागपूर पासून नागपूर – बुटीबोरी – वर्धा – महागाव – अर्धापूर – अंबाजोगाई – परळी वैद्यनाथ – कुर्डुवाडी – अकलूज – म्हसवड – विटा – कोल्हापूर – पणजी या क्षेत्रांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.
हा महामार्ग बनवत असताना या मार्गावरील धार्मिक तीर्थस्थळांचा विचार करून ‘नागपूर – बुटीबोरी – वर्धा – महागाव – अर्धापूर – अंबाजोगाई – परळी वैद्यनाथ – कुर्डुवाडी – अकलूज – म्हसवड – विटा – कोल्हापूर – पणजी’ अशा मार्गाची आखणी करावी यामुळे अंतर कमी होऊन ते पार करण्यास लागणारा वेळ कमी होईल. याबरोबरच वाटेतील रेणुका माता देवी (माहूर) योगेश्वरी देवी (अंबाजोगाई) वैद्यनाथ मंदिर (परळी वैजनाथ), नीरा नृसिंहपुर, श्रीनाथ मंदिर, म्हसवड, महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर) ही तीर्थस्थळे जोडली जाणार आहे.
तसेच हा महामार्ग झाल्यास प्रस्तावित सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, पुणे – बंगळुरू द्रुतगती महामार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, मुंबई – गोवा ग्रीनफिल्ड महामार्गाला जोडला जाईल. ज्याचा फायदा दूरच्या पल्ल्याची वाहतूक सुखकर होण्यास होईल. मोठ्या शहरांशी ही प्रस्तावित गावे जोडली गेल्यावर या भागातील विकासाला चालना मिळेल आणि जलद दळणवळण आणि भूसंपादन प्रक्रिया देखील सुलभ होईल. त्यामुळे याचा विचार करून संबंधित ठिकाणे समाविष्ट करण्याबाबत आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांना दिले,