महाराष्ट्रलेख

आमदार कामदार नको, दमदार पाहिजे!

गोण्या रिकाम्या व भरलेल्या!

आमदार कामदार नको,
दमदार पाहिजे!

गोण्या रिकाम्या व भरलेल्या!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/7/2023 :
सध्या कोणत्या आमदाराला किती किती गोण्या भरून निधी मिळालां याची जोरात चर्चा सुरु आहे. आमदार जेवढा दमदार तेवढा त्याचा निधी जोरदार आणि आमदार जेवढा कामदार तेवढा त्याचा निधी टीपदार(वेटरला देतात ती टीप म्हणजे टीपदार).
दमदार आमदारांची यादी बघा सर्वं निधी कोटीत आहे राष्ट्रवादीS म्हणजे शरद पवार गट, राष्ट्रवादीA म्हणजे अजित पवार गट आणि सेनाS म्हणजे शिव सेना एकनाथ शिंदे गट.

प्रशांत बंब भाजपा 742
जयंत पाटील राष्ट्रवादीS 580
दत्ता भरणे राष्ट्रवादीA 436
राजेश टोपे राष्ट्रवादीS 293
मकरंद पाटील राष्ट्रवादीS 291
रोहित पवार राष्ट्रवादीS 210
भरत गोगावले सेनाS 134
किरण लम्हाटे राष्ट्रवादीA 116
दिलीप वळसे राष्ट्रवादीA 96
विनोद निकोले सेनाS 76
अजित पवार राष्ट्रवादीA 73
अब्दुल सत्तार सेनाS 58
महेंद्र थोरवे सेनाS 48
महेंद्र दळवी सेनाS 45
अदिती तटकरे राष्ट्रवादीA 40
संदीप क्षीरसागर राष्ट्रA 35
माणिकराव कोकाटे राष्ट्रA 33
छगन भुजबळ राष्ट्रवादीA 31
संदीपान भुमरे सेनाS 29
महेश बालदी सेनाS 28
हसन मुश्रीफ राष्ट्रवादीA 22
धनंजय मुंडे राष्ट्रवादीA 21
संतोष बांगर सेनाS 19
प्रकाश साळुंके राष्ट्रवादीA 13

मित्रानो पाहिलं वरील दमदार आमदारांनी कशा पैशाच्या गोण्या भरून घेतल्या? याला म्हणतात दमदार आमदार. गंगापूर जि संभाजीनगर इथले हे आमदार आहेत प्रशांत बंब. त्यांनी सर्वात जास्त निधी म्हणजे 742 कोटी रुपये निधी घेतलां. क्रमांक दोनवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार आहेत, जयंत पाटील त्यांनी 580 कोटी मिळविले. वरील यादी बघा कोणी 400, कोणी 300, 200 शंभर करत 13 कोटी रुपये पर्यंत निधी घेतला. हे खरे लढावीय्ये आहेत. या पैशातून ते आपल्या मतदार संघात विकास घडवून आणतीलं. मतदारांना सुखसोई देतील. या मोठ्या फंड लुटीत एकही खान्देशी आमदार नाही. आहे कीं नाही कमाल? नंदुरबारचे चार आमदार आहेत. त्यातील एक मंत्री आहेत. धुळ्याचे 5 आमदार आहेत, जळगावचे 11 आमदार आहेत, त्यातील तीन मंत्री आहेत. कसमादेचे 5 आमदार त्यात एक मंत्री. म्हणजे अहिर पट्यातील 25 आमदार आहेत आणि त्यातील 5 आमदार कॅबिनेट मंत्री, तरी या फंड लुटीत एकही खान्देशी आमदार नाही. खरं तर भाजप आणि शिवसेना यांना सर्वात जास्त पाठिंबा खान्देशने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र खांदेशातील 8 लोकसभेतील आठच्या आठ जागा खान्देशने सेना भाजपला दिल्या आहेत. तरी या करोडोच्या पावसात आमचा एकही आमदार भिजला नाही. कसा होईल आमचा विकास?
काँग्रेसच्या 15 आमदारानां एक रुपया सुद्धा नाही. इतर 20 आमदारांना 1 ते 3 कोटी ठाकरे गटातील आमदारांनाही काहीच नाही. कोणा खान्देशी आमदाराला निधी मिळाला कीं नाही माहीत नाही. त्यांची नावं कुठं दिसत नाहीत. म्हणजे त्यांना निधी मिळाला नसावा. एक दोन कोटी कोणाला मिळाला असेल तर तो हक्काचा आणि कायदेशीरं निधी असतो. वर्षाला तो दोन कोटी असतो.
म्हणजे कांय तर निधी मिळालेले आमदार भरलेल्या गोण्या सारखे आहेत. ते ताठ उभे राहतील आणि ज्यांना निधीच मिळाला नाही ते या रिकाम्या गोण्या सारखे आहेत. ज्यांना कधी ताठ उभाच रहाता येणार नाही.
ताठ उभ्या राहणाऱ्या गोण्या फक्त पैशानेच भरलेल्या असव्यात असं नाही. विचाराने भराव्या, एकोप्याने भराव्या, अस्मिता, प्रेम, स्वाभिमान, यांनीही भरल्या तरी त्या ताठ उभ्या राहतील.
सर्वांनां एकच सूचना करतो. रिकामी गोणी बनून जमिनीवर लोळत पडण्यापेक्षा भरलेल्या गोण्या बनून ताठ कण्यांनी उभे रहा. मला तात्या साहेब शिरवाडकराच्या कोलंबसाचे गर्व गीतातील ओळी सदैव खुणावतात. कोलंबस खवळलेल्या अटलँटिक महा सागाराला उद्देशून म्हणतो,
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा डळमळू दे तारे!
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशा कोन सारे!
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागाराला!
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!


बापूसाहेब हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button