माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ६० कोटी रूपये मंजूर
माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ६० कोटी रूपये मंजूर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 18/7/2023 :
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२३ मध्ये माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून ६० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
तालुक्यातील २९ रस्त्यांसाठी ३०.८० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यात राज्यमार्गासाठी ५ कोटी रूपये, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गासाठी २५.८० कोटी रुपये आहेत.
तालुक्यातील ५ पूल बांधण्याकरीता १९.१३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
माळशिरस येथील न्यायाधीशांचे निवासस्थानाच्या बांधकामाकरीता ८.९० कोटी तर दुय्यम निबंधक कार्यालय बांधकामास १.६६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अशा रीतीने आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध विकास कामांकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.