धनगर आरक्षण अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी यासाठी पंढरपुरात २४ सप्टेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन
धनगर आरक्षण अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी यासाठी पंढरपुरात २४ सप्टेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक :22/9/2024 :
सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य मार्फत राज्य सरकारला पुरेसा कालावधी देऊन देखील सरकारने आरक्षण अंमलबजावणी केली नाही. सरकार आणि सरकारी अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. पंढरपूर, नेवासा व लातूर येथे धनगर उपोषणकर्ते जीवाची बाजी लावून बसलेले असून सरकार इतरांना वेगळा न्याय व धनगरांना वेगळा न्याय देताना दिसत आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पंढरपूर येथे मंगळवारी महामेळावा आयोजित केला आहे. या साठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
टिळक स्मारक मैदान, पंढरपूर या ठिकाणी उपोषण स्थळी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पंढरपुरात होत असलेल्या महामेलाव्यात लाखोंच्या संख्येने आपल्या लेकरा बाळांना घेऊन उपस्थित राहावे. येणारा आठवडा अत्यंत महत्वाचा आहे, सरकार सोबत आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी बैठका सुरू असून आपली संख्या त्या ठिकाणी दिसली तर मोठा परिणाम होऊन सरकार अंमलबजावणी लवकर करू शकते. असे मत महामेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करताना सकल धनगर जमात समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य ऍड. विजयभाऊ गोफणे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले.