सामाजिक बांधिलकी जपत ४६ वर्षापासून अविरतपणे कार्य करणारी संस्था- कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील 💢 प्रताप क्रीडा मंडळाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

🟦 सामाजिक बांधिलकी जपत ४६ वर्षापासून अविरतपणे कार्य करणारी संस्था- कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील
💢 प्रताप क्रीडा मंडळाची
४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक01/10/2024 :
सन १९७६ पासून कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य इत्यादीसह अनेक क्षेत्रात विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धा राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज ची सन २०२४-२५ ची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) व स्व.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (आक्कासाहेब) यांच्या प्रतिमांचे पूजन जेष्ठ संचालक वसंत जाधव यांच्या शुभहस्ते व अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, स. म. साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर चौगुले या मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले.
प्रारंभी स्वागत व इतिवृत्ताचे वाचन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी केले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सभेत सहा विषयांचे वाचन करण्यात आले त्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी मंडळाच्या वतीने स्व. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे अमृत महोत्सवी वाढदिवस निमित्त वार्षिक स्पर्धा व उपक्रम राबविले जात असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. सहकार महर्षिंनी स्थापन केलेल्या संस्था सांभाळणे ही फार मोठी जबाबदारी असून संस्थापक जयसिंह मोहिते पाटील(बाळदादा) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने सर्व उपक्रम, स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहेत. सामाजिक बांधिलकीचा उद्देश समोर ठेवून गत ४६ वर्षापासून मंडळ अविरतपणे कार्य करत आहे. सभासदांनी आपले मानसिक आरोग्य जपत शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
या सभेस मंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ , सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले.बाळासाहेब सावंत यांनी आभार मानले. सभेची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने झाली.