ताज्या घडामोडी

“प्रत्येक इंग्रजी इंडियन सरकारने भारतीय संविधानाचा दुरुपयोग करत भारताचे नुकसानच केले”- विठ्ठल पवार राजे

“प्रत्येक इंग्रजी इंडियन सरकारने भारतीय संविधानाचा दुरुपयोग करत भारताचे नुकसानच केले“- विठ्ठल पवार राजे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 26/05/2024 :

“भारत देशाचं संविधान धोक्यात नसून, इंडियातील सरकारे धोकेबाज आहेत, प्रत्येक इंग्रजी इंडियन सरकारने भारतीय संविधानाचा दुरुपयोग करत भारताचे नुकसानच केले आहे!” ज्या ज्या इंग्रजाच्या काळ्या अवलदींनी भारत देशातलं संविधान बदलण्याचा घाट घातलेला आहे, ती सरकार भारतीय शेतकरी आणि जनतेने बदललेली आहेत. म्हणून संविधान नव्हे तर ती इंग्रज्यांच्या अवलादींची सरकार धोक्यात आलेली आहेत हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि संविधान धोक्यात आणण्याला जितके राज्यकर्ते जबाबदार आहेत तितके विरोधी पक्ष देखील जबाबदार आहेत. एवढेच नव्हे तर ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या निर्मात्यांचे अनुयायी देखील संविधान बुडव्यांच्या बाजूने उभे राहिले यापेक्षा या भारत देशाचे दुसरे दुर्दैव ते कोणतं नाही. यामध्ये अधिक जास्त चिंता हे राज्य आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेला आहे.असे मत राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती जनजातीयम अल्पसंख्यांक महासंघाचे वेस्टर्न भारताचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर बिनधास्त आरोप केले.
शेतकरी संघटना व संघटनेची महा ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीला महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार ग्रुपचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२४ प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते विठ्ठल राजे पवार यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजे पवार बोलत होते. अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे आणि एनयूबीसी चे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, प्रसिद्धीप्रमुख अशोक बालगुडे, डॉ. बळीराम जाधव, एम ए खान आणि प्रदीप दिव्य वीर यांनी दिली. पुढे बोलताना पवार राजे म्हणाले की, आमच्या माय बहिणीचं मंगळसूत्र सरकारने हिरावून घेतलं! राज्य अन् देश विधवा केलात! त्यामुळे राज्य आणि देशात मतदारांची लाट निर्माण झाली आहे. गेल्या २०१३-१४ पासून तर वीस-बावीस पर्यंत राज्य आणि देशांमध्ये ०१लाख १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या! त्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या हत्या आहेत. सरकार मुळे शेतकऱ्यांच्या माता भगिनींचे मंगळसूत्र गहाणवट पडलेले, तुटलेले असताना विकासाच्या गप्पा कशाला मारतात.? शेतकरी आत्महत्याला सत्ताधारी बरोबर विरोधी पक्ष देखील जबाबदार असल्याचा घणाघात शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी परिषदेत केला. राज्यात प्रचंड तीव्रतेचा दुष्काळ असताना राज्यकर्ते निवडणुका संपल्यानंतर देखील सत्तेच्या स्वप्नात मश्गुल होऊन ऐश करतायेत असा आरोप देखील राजे पवार यांनी केला. ते म्हणाले की राज्यामध्ये पशुधनाला चारा पाणी नाही अनेक शेतकरी कष्टकरी कामगार संकटात आलेला आहे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये थकबाकीत आहेत दूध उत्पादक शेतकरी दररोज 25 कोटी रुपयाला लुटला जात आहे. कांद्याचा शेतकरी हा जवळपास 30000 हजार कोटीला लुटला गेला, राज्यात दररोज एक ते दीड कोटी लिटर जहरीले भेसळ दूध हे राज्यातले नागरिक विकत घेत आहेत त्याला देखील सरकार जबाबदार आहे. मात्र सरकार आणि सरकारमध्ये निवडून आलेले राज्यकर्त्यांना अजूनही जाग आलेली नाही. राज्या राज्यात, देशात शेतकऱ्यांची आणि मतदारांची लाट निर्माण करण्यास खुद्द सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला. पत्रकारांनी विचारलेल्या काश्मीर आणि भारत यामधील अनुदान अथवा शेतमाल संदर्भात विचारलेला प्रश्नाला त्यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिले ते म्हणाले की ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ना राज्यातल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले यांना काश्मीरमधल्या! शेतकऱ्यांना अनुदान वाटले, हा केवळ राजकीय जुमला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर व पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button