
जातीपातीचा गडद रंग
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 25/5/2025 :
प्रेम झालं,लग्नही केलं
म्हणजे संसार होत नसतो
योग्य जोडीदार मिळणं हा
नशिबाचाच भाग असतो ll
नाव अगदी कृष्णा असलं
अंगी देवपण येत नसतं
अपेक्षा आणि वास्तव यात
फारच मोठं अंतर असतं ll
वैष्णवीच्या नशिबी आलं
ते तर फारच वाईट होतं
जाहीर निषेध करायलाही
समाजाचं मन का कोतं ?
“हगवणे”च्या जागी चुकून
“नरवणे”चा हात असता
आईशप्पथ “त्यां”नी अवघा
महाराष्ट्रच जाळला असता ll
मी सांगतो लिहून घ्या
प्रकरण फार वाढणार नाही
निषेधाचे कॅण्डल मोर्चे
कुणीच साला काढणार नाही ll
जातीपातीचा गडद रंग
असतो इथल्या निषेधाला
द्वेष सोडून निखळ निषेध
मिळत नाही औषधाला ll
आडनाव आणि जात बघून
आंदोलनाची ठरते दिशा
शेंडी,जानवं फासावरती
पाटील टेचात पिळतो मिशा ll
AK ( काव्यानंद ) मराठे
कुर्धे,पावस,रत्नागिरी
9405751698