ताज्या घडामोडी

“धनगर आरक्षणाच्या आड येणाऱ्या लांडग्यांसाठी हातात काठी घ्या”- आ. गोपीचंद पडळकर

शरद पवारांच्या दिशेने डागले टीकास्त्र

“धनगर आरक्षणाच्या आड येणाऱ्या लांडग्यांसाठी हातात काठी घ्या”-
आ.गोपीचंद पडळकर

शरद पवारांच्या दिशेने
डागले टीकास्त्र

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 16/10/2023 :
राज्यामध्ये दोन कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग होईल या भीतीने समाजाला त्यांच्या हक्कापासून जाणून-बुजून दूर ठेवण्याचे कपटी कारस्थान यापूर्वी प्रस्थापितांनी केले. धनगर आणि धनगड यातील “र” व “ड” च्या खेळात शरद पवार यांनी समाजाला अडकवण्याचे काम केले. त्यामुळे इथून पुढे समाजाने प्रस्थापितांच्या षडयंत्राला बळी न पडता आरक्षणाच्या आड येणाऱ्या लबाड लांडग्यासाठी हातात काठी घेऊन आपली धनगरी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असा घणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी विझोरी तालुका माळशिरस येथील जाहीर सभेत केला.
धनगर समाजाची एस.टी. आरक्षण अंमलबजावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या धनगर जागर यात्रेची सुरुवात विझोरी (तालुका माळशिरस) येथून झाली. त्यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन करत होते. यावेळी माळशिरस , सांगोला , पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पडळकर यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम प्रस्थापितांनी केल्याचा आरोप करीत शरद पवार यांच्यावर निशाणा साधत चौफेर टीकास्त्र डागले. आ.पडळकर म्हणाले की ,राज्यात धनगड ही जात अस्तित्वात नसताना देखील 1981 मध्ये शरद पवार यांनी गडचिरोलीमध्ये एक धनगड असल्याचा शोध लावला. या देशांमध्ये धनगर समाजावर सर्वात जास्त अन्याय झाला आहे. समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून रोखून ठेवण्याचे काम प्रस्थापितांनी केले. धनगर समाज मोठा असूनही गुलामगिरीतच जीवन जगत आहे .समाजाला दुय्यम स्थान आहे. धनगर समाजाचे एस.टी .आरक्षण न्यायप्रविष्ठ आहे. दिनांक आठ डिसेंबर 11 डिसेंबर व १५ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालयीन लढाई पूर्ण ताकदीने चालूच आहे. त्यामध्येही काही अडचण आलीच तर सकल
धनगर समाजाने रस्त्यावरील लढायला तयार राहण्याचे आवाहन ही आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित जनसमुदायाला केले . पुढे बोलताना आ.पडळकर म्हणाले की,लांडग्यांना धनगरी ताकद दाखवा, काठी हातात घ्या
धनगर ही राजकर्ती जमात होऊ शकते .सर्वांनी एक जुटीने नोकरी सत्तेत आपल्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी दबाव गट तयार करायला हवा .असे झाले तरच जमात भविष्यात अग्रस्थानी असेल. मिळालेले एन.टी आरक्षण म्हणजे धनगर समाजाचा घात असून एस.टी आरक्षण हे मिळणे गरजेचे आहे आणि ते लवकरच मिळेल या हक्काच्या आरक्षणा आड एखादा लबाड लांडगा येत असेल तर त्याला हातात काठी घेऊन धनगरी ताकद दाखवा.
आडवा येईल त्याला तुडविण्याची तयारी ठेवा
मी पहिल्यांदा धनगर आहे नंतर आमदार आहे. त्यामुळे ढोलावर मारून थाप, अन्यायाचा घेवु हिसाब, लांडग्यावरती उगारू काठी ,धनगर आरक्षणासाठी ..या काव्यपंक्तीतून आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी अहवान करीत आपल्या संस्कृतीचे जतन करा व आपल्याला कोण आडवा येईल त्याला तुडवण्याचीही तयारी ठेवा ..असे संबोधित केले.
साहेब, ताई, दादा डोक्यातून कायमचेच काढा..
धनगर समाजाला सतत ज्यांनी गुलामाप्रमाणे वागणूक दिली. शैक्षणिक ,आर्थिक विकासापासून दूर ठेवले. धनगर आणि धनगड या खेळात अडकवून धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आपली पोळी भाजून घेतली. अशा साहेब,ताई ,दादा यांना डोक्यातून कायमचे काढून टाका .आपले एकच साहेब आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर .त्यांच्या विचारांचे अनुकरण करा आणि त्यांनी दिलेले आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा. असे म्हणत कुणाचे नाव न घेता आमदार पडळकर यांनी बारामतीकर पवारांना तिरकस टोला लगावला.
“तो” लांडगा कोण..?
धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या आड लांडगा आला तर त्याच्यासाठी हातात काठी घ्या. या आमदार पडळकर यांच्या वाक्यावर तो लांडगा कोण? असे पत्रकारांनी विचारल्या नंतर आमदार पडळकरांनी अतिशय मिश्किल पणे उत्तर देत, तो लांडगा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे .यांनी आर.पी.आयचे विभाजन केले .तो लांडगा धनगर समाजातही फूट पाडू शकतो .त्यामुळे किंवा त्यांच्या आरक्षणाच्या आड येऊ शकतो असे बोलून कुणाचे नाव घेण्याचे टाळले.
“माझ्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो”..
आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून धनगर समाजाचे प्रबोधन आणि त्यांना जागृत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत .हे काही जणांना पाहवत नाही. माझ्यावर दोन वेळा हल्ला केला. आताही जागर यात्रेच्या माध्यमातून मी माझ्या धनगर समाजासाठी आमदारकी पणाला लावू शकतो . समाजासाठी आयुष्यभर लढत राहू . समाज जागृत झाल्यानंतर अनेक प्रस्थापितांसाठी तुल्यबळ असा स्पर्धक निर्माण होऊन त्यांच्या साम्राज्याला धक्का बसेल.त्यामुळे माझ्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो असे पडळकर यांनी यावेळी सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर जमिनीवर प्रेक्षकांमध्ये बसतात तेव्हा..

विझोरी येथील जागर यात्रेत आमदार गोपीचंद पडळकर साठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर एकमेव खुर्ची त्यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. त्या खुर्चीत न बसता जमिनीवर उन्हात बसलेल्या प्रेक्षकांमध्ये मांडी घालून भाषणे ऐकणारे आमदार गोपीचंद सर्वांना भावले .आपण आमदार आहोत हे विसरून लोकांमध्ये मिसळून त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे आमदार पडळकर पाहिल्यानंतर, त्यांचा आदर्श इतर नेत्यांनीही घेऊन समाजात एकरूप कसे व्हावे हे त्यांच्याकडून शिकावे.अशी चर्चा यावेळी गर्दीतून ऐकू येऊन येत होती.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button