‘तेल्या आणि भूत्या पैलवानांची आज साताऱ्यात लढत
.
*राजधानीची बखर 15*
‘तेल्या आणि भूत्या पैलवानांची
आज साताऱ्यात लढत
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.मुंबई
मुंबई दिनांक 04/05/2024 :
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं जितकं कौतुक झालं, तितका विरोधही झाला. कोणी म्हणे
‘जाणता राजा’
तर कोणी म्हणे ‘
मैद्याचं पोतं’.
अशा कित्येक उपाध्या मिळाल्या असल्या तरी, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना दिलेली
‘तेल लावलेला पैलवान’
ही उपाधी तंतोतंत लागू पडते.
पवारांनी अनेक उलाघाल्या केल्या. पण आजतागायत कोणाच्याच हाताला लागले नाहीत. म्हणूनच हा तेल लावलेला पैलवान महाराष्ट्रात उभा आहे. आणि आजच त्यांची साताऱ्यात ‘महाराष्ट्र केसरी’साठी अंतिम लढत होत आहे.
पवारांच्या विरोधातला पैलवान जितका गौरवलेला आहे, त्यापेक्षा त्याची मानहानीच जास्त झाली आहे. फडणवीसावर टीका कर आणि बायकोपुढं पुरूषार्थ दाखव असला प्रकार कित्येक वर्षे सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी जर तेल लावलेला पैलवान ही उपाधी मिळवली असेल,
तर
पवारांपेक्षा निम्म्या कालावधीत सारा महाराष्ट्र काबीज करणारा फडणवीस हा नुसता पैलवान नाही, तर साक्षात
“भुत्या पैलवान” आहे. तेल लावल्यानं पवार कोणाच्या हाती लागले नाहीत. तसेच आजवर फडणवीसही कोणाच्या हाती लागले नाहीत. याशिवाय त्यांनी अनेक ठिकाणी भुतासारखा संचार केला. आणि भुतासारखी अनेक माणसं इकडून तीकडे उचलून आपटली. त्याच भुत्या पैलवानाची आज साताऱ्यात तेल लावलेल्या पैलवानाबरोबर अंतिम झुंज आहे.
शरद पवार पुन्हा एकदा जिल्हा परिषद मैदानावर उद्या सांगता सभा घेत आहेत. जर पुन्हा पाऊस पडला, तर छत्री धरायला उदयनराजेंनी या खास भुत्या पैलवानाचे प्रयोजन जिल्हा तालीम संघावर केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक प्रभाव ठेवणारे शरद पवार गेली 45 वर्षे आपले गारूड ठेवून आहेत. पवारांना ही औकाद मिळवायला जितकी वर्षे गेली, त्याच्या निम्म्या भारतात वर्षात फडणवीसांनी महाराष्ट्र काबीज केला. माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान तथा ए. आर. अंतुले यांच्यावर जितक्या टीका झाल्या, त्यापेक्षा सर्वाधिक टीका फडणवीसांना सहन करावी लागली. जात, धर्म, पक्ष, बायको आणि मुलीपर्यंत या टिकेचा स्वर खालावला गेला. मात्र टिकेला भीक घालेल तो फडणवीस कुठला…
‘सामना’च्या अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांना ‘तेल लावलेला पैलवान’ ही उपाधी चिकटवली होती.
मी तर आज म्हणतो,
‘देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला ‘भुत्या पैलवान’ आहे.
हा भुत्या पैलवान अदृश्य होऊ शकतो… हा भुत्या पैलवान रातोरात तिकडच्या माणसांना इकडं आणतो…
हा भुत्या पैलवान मुंबईतले आमदार गुवाहाटीला नेतो…
आणि हा भुत्या पैलवान त्या बुडाखालचं सिंहासन या बुडाखाली आणतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात जे जे पवारांना जमलं नाही, ते ते सगळं या भुत्या पैलवानानं करून दाखवलं आहे.
साताऱ्यात तेल्या पैलवान की भुत्या पैलवान?
भाजपच्या वाटेवर असलेल्या उदयनराजेंना दहा वर्षे खासदार करून ठेवण्याची किमया तेल्या पैलवानानं करून दाखवली. मात्र त्याला भुत्या पैलवानानं डोक्यावर टाकलं आणि निवडून आलेल्या छत्रपतींना तीन महिन्यात राजीनामा देऊन आपल्या पक्षाचा खासदार केलं.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर वेगवेगळ्या पातळीवर राजकारण सुरुच असलं, तरी सातारा जिल्ह्यासाठी या तेल्या आणि भुत्या पैलवानाचा सामना वेगळ्याच रंगात आला आहे.
पाच वर्षांपूर्वी तेल्या पैलवानाच्या by by गटात जे होते, त्यात एकही जोडवाक्य नाही किंवा जोडनेता नाही.
उलटपक्षी
भुत्या पैलवानानं उदयनराजेंच्या गाठीला साक्षात आमदार मकरंद पाटील, नेते पुरूषोत्तम जाधव, साक्षात आमदार महेश शिंदे अशी अनेक आयुधं उभी केली आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर
‘तेल्या पैलवान आणि भुत्या पैलवान’
यांची लढत उद्या साताऱ्यात होत आहे.
म्हणजेच साताऱ्यात तेल्या आणि भुत्या या दोघांची सांगता सभा होणार आहे. दरवेळी वेगळे शब्द आणि पाऊस घेऊन येणारा तेल्या उद्या साताऱ्यात काही करिष्मा करेल तर त्याचा बिमोड करण्यासाठी उदयनराजेंनी भुत्या पैलवान निमंत्रित केला आहे.
साताऱ्याच्या पाऊस पडलेल्या जिल्हा परिषद मैदानावर तेल्या पैलवान आहे, तर शहराच्या मध्यभागी वसलेल्या तालीम संघ मैदानावर भुत्या पैलवान आहे. मैदाने वेगवेगळी असतील, पण दोघं लढतील राजधानीच्या मैदानावर.
तेल लावलेल्या पैलवानाला पकडण्यासारखं आता काहीच नाही. त्यामुळं साऱ्या नजरा भुत्या पैलवानाकडं लागल्या आहेत.
दीपक प्रभावळकर, सातारा
– 9325403232