ताज्या घडामोडी
बाबुराव बोत्रे पाटील यांना “Best Businessman Award 2025– Real Hero” पुरस्कार

बाबुराव बोत्रे पाटील यांना “Best Businessman Award 2025– Real Hero” पुरस्कार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/12/2025 :
उद्योगविश्वात कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा ठसा उमटवणाऱ्या बाबुराव बोत्रे पाटील यांना ‘Best Businessman Award 2025 – Real Hero’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात येत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा हा सन्मान त्यांच्या उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबरोबरच सामाजिक बांधिलकीचीही पावती देणारा आहे. नेतृत्व, दूरदृष्टी आणि जबाबदारीची जाणीव या मूल्यांवर आधारित त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.
हा पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून कष्ट, चिकाटी आणि मूल्याधिष्ठित उद्योजकतेच्या यशाची दखल आहे.
